Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cm ladaki bahin yojana changes ] : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांमध्ये मुदतवाढी ते व्याक्तींमध्ये वाढीसह 7 मोठे बदल करण्यात आलेले आहेत , तसेच ज्यांना महिलांना लाभ दिला जाणार नाही , अशांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे .
महत्वपुर्ण 7 बदल : सदर योजना अंतर्गत रहिवाशी प्रमाणपत्र सादर करण्याचे नमुद करण्यात आलेले होते , परंतु आता त्याऐवजी 15 वर्षापुर्वीचे मतदार ओळखपत्र , रेशन कार्ड , शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्माचा दाखला या पैकी कोणताही प्रमाणत्र / ओळखपत्र सादर करु शकता ..तसेच सदर योजनांच्या माध्यमातुन 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर या योजनांमधून या पुर्वी वयोमर्यादा ही 21 ते 60 वर्षे अशी होती , तर यांमध्ये बदल करुन वय वर्षे 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना आता या योजनांतुन लाभ मिळणार आहे . तसेच दुसऱ्या राज्यांमध्ये जन्म झालेल्या परंतु राज्यातील पुरुषांबरोबर विवाह झालेल्या बाबतीत त्यांच्या पतीचे शाळा सोडल्याचा दाखला , अधिवास प्रमाणपत्र , जन्माचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे .
या योजनांच्या माध्यमातुन आता एका पात्र अविवाहीत महिलांना या योजनांच्या माध्यमातुन लाभ देण्यास परवानगी देण्यात आली आहे . तसेच ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल अशा प्रसंगी त्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असणारे पिवळे व केशरी रेशनकार्ड अशांना सदर उत्पन्नांच्या दाखला प्रमाणपत्रांमधून सुट देण्यात आलेले आहे .
अर्ज करण्यास मुदतवाढ : शासन निर्णयानुसार अर्ज सादर करण्यास दिनांक 15 जुलै पर्यंत मुदवाढ देण्यात आलेली होती , परंतु आता दिनांक 21 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेले आहे , तर अर्ज प्राप्तीनुसार दिनांक 01 जुलैपासुन दरमहा 1500/- आर्थिक लाभास सुरुवात होणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
या महिलांना मिळणार नाही लाभ : या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यास अपात्र ठरणाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे पाहुयात ..
- ज्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल अशा कुटुंबातील महिला अपात्र ठरतील .
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे आकरदाता असेल , अशांना लाभ मिळणार नाही .
- ज्यांच्या कुटुंबामधील सदस्य हा नियमित / कायम कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम / मंडळ / भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत अथवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असल्यास , परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत तसेच स्वयंसेवी कामगार व कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत .
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान खासदर / आमदार आहेत ..
- ज्यांच्या कूंटुंबामधील सदस्य हे भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष / उपाध्यक्ष / संचालक / सदस्य असेल अशा महिला अपात्र ठरतील .
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ( यांमध्ये ट्रक्टर वगळून ) त्यांच्या कुटुंबामध्ये कोणत्याही सदस्यांचे नावावर नोंदणीकृत आहे , अशांना सदर योजनांच्या माध्यमातुन लाभ दिला जाणार नाही .