Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cm baliraja free electricity scheme – 2024 ] : मुख्यमंत्री बळीराज मोफत वीज योजना – 2024 राबविणेबाबत राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा , कामगार व खनिकर्म विभाग मार्फत दिनांक 25 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
भारतामधील शेती मुख्यत : पावसावर अवलंबून आहे , मात्र काही वर्षांमध्ये झालेल्या जागतिक वातावरणीय बदलांमुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून , त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत . अशा संकटात सापडलेल्या राज्यातील 7.5 एचपी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासुन मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्यास मान्यता देण्यात येत आहेत .
याकरीता राज्यातील 7.5 एच पी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहेत . माहे एप्रिल 2024 पासुन 7.5 एचपी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहेत . तसेच शासनास विद्युत अधिनियम 2003 , कलम 65 नुसार कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देवून त्यानुसार अनुदानित वीज दर लागु करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आलेले आहेत .
त्यानुसार वीज बील माफ केल्यानंतर सदर वीजदर सवलती पोटी रक्कम शासनांकडून महावितरण कंपनीला अग्रीम स्वरुपात वर्ग करण्यात येईल . सध्या देण्यात येणारी वीजदर सवलती पोटी प्रतिवर्षी रुपये 14,760/- कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येईल .
सध्या देण्यात देण्यात येणारी वीजदर सवलत रुपये 6985/- कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 /- कोटी असे वार्षिक वीजदर सवलती पोटी प्रतिवर्षी रुपये 14,760/- कोटी शासनांकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येणार आहेत .
या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास , त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनांकडून रक्कम वर्ग करण्यात येणार आहेत . या संदर्भात उद्योग , कामगार व खनिकर्म विभाग मार्फत दिनांक 25 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !