Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ CM Annapurna yojana scheme ] : मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस् सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देणेबाबत , राज्य शासनांच्या अन्न , नागरी व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत दिनांक 30 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना त्याचबरोबर मुख्यमंत्री – माझाी लाडकी बहीण योजनाच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 03 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे . सदर योजना ही मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना या नावाने राबविण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत .
सदर योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता : सदर योजना अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक असेल , तसेच सद्य स्थितीमध्ये राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी सदर योजना करीता पात्र असणार आहेत .
तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र ठरणार आहेत . तसेच एका कुटुंबात ( रेशन कार्डनुसार ) केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र ठरेल . तसेच सदर लाभ केवळ 14.2 कि.ग्रॅ.वजनाच्या गॅस सिलेंडरच्या जोडणी करीता अनुज्ञेय असेल .
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्य लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते . तसेच राज्य शासनांच्या मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना अंतर्गत द्यावयाच्या 03 मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल , असे नमुद करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : 10 वी उत्तीर्ण असाल तर राज्य शासन सेवेत 6500+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन..
तसेच सद्य स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत वितरीत होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपुर्ण रक्कम ( सरासरी रुपये 830/- ) ग्राहकांकडून घेतली जाते . त्यानंतर केंद्र शासनांकडून प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत देण्यात येणारी 300/- रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे .
म्हणजेच तेल कंपन्यांनी राज्य शासनांकडून द्यावयाची अंदाजे 530/- रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ही ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तर सदर योजना अंतर्गत एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरकरीता सबसिडी देण्यात येत नाही , असे नमुद करण्यात आलेले आहेत .
तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांच्या लाभार्थ्यांसाठी देखिल सदर योजना अंतर्गत 03 मोफत सिलेंडर देण्यात येणार आहेत . याबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..