Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ cm aiknath shinde 10 big announcements ] : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ यांनी शिंदे सक्रिय सहभाग घेतला असून , काल दिनांक 05 नोव्हेंबर 2024 रोजी कोल्हापूर येथे झालेल्या सभेत राज्याचे मुख्यमंत्री , दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 10 महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आले आहेत .
लाडकी बहीण योजना तसेच वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ : राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता स्थापन झाल्यास , लाडकी बहीण योजना अंतर्गत दरमहा देण्यात येणारी रक्कम 1500/- वरून 2100/- रूपये वाढ करण्याची घोषणा केली आहे . त्याचबरोबर वृद्धांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये 1500/- रुपये वरून 2100/- अशी वाढ करण्याची घोषणा केली आहे .
शेतकऱ्यांची कर्जमाफी : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करण्यात येईल , याशिवाय शेतकरी सन्मान योजनेमधून दरवाजाला 12 हजार रुपये वरून सन्मान राशीत 3000/- रुपयांची वाढ म्हणजेच वर्षाला 15,000/- रुपये देण्याची घोषणा त्याचबरोबर MSP किमतीवर 20% अनुदान देण्याची घोषणा केली आहे .
अन्न , निवाराची घोषणा : यामध्ये राज्यातील प्रत्येक गरीब नागरिकाला अन्न तसेच निवारा देण्यात येईल , अशी घोषणा केली आहे . त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती परवडेल अशा स्थितीत स्थिर ठेवण्यात येईल .
रोजगार : राज्याच्या गृह (पोलीस ) विभागामध्ये 25,000 महिलांची भरती केली जाईल , अशी घोषणा केली आहे . त्याचबरोबर राज्यामध्ये भविष्यात 25 लाख रोजगारांची निर्मिती त्याचबरोबर 10 लाख विद्यार्थ्यांना रुपये 10,000/- रुपये इतके विद्यावेतन दिले जाईल .
तसेच राज्यात 45,000 गावात पाणंद रस्ते तसेच अंगणवाडी आणि आशा सेविकांना दर महिन्याला 15,000/- रुपये वेतन देण्याची घोषणा केली आहे . याशिवाय वीज बिलामध्ये 30% कपात करून अक्षय तसेच सौर उर्जेवर अधिक भर देण्यात येईल . त्याचबरोबर महायुतीची सरकार स्थापनेनंतर व्हिजन महाराष्ट्र @2029 ‘ 100 दिवसाच्या आत सादर करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे .