पुढील 4 दिवस राज्यात ढगाळ वातावरणांस अवकाळी पावसाची हजेरी – जाणून घ्या हवामान तज्ञ पंजाबराव यांचा नवा अंदाज .

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Cloudy weather with unseasonal rain expected in the state for the next 4 days ] : राज्यात पुढील चार दिवस ढगाळ वातावरणांसह अवकाळी पावसाची हजेरी लावण्याची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डख वर्तविण्यात आला आहे .

पुढील चार दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असेल तर किमान तापमानात देखिल वाढ होईल . तर हवामान खात्याकडून दिलेल्या अंदाजानुसार , उत्तर महाराष्ट्र , उत्तर कोकण , व मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात दिनांक 17 जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण असेल , त्यानंतर म्हणजेच दिनांक 18 जानेवारी नंतर पुन्हा एकदा थंडीचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

दिनांक 17 जानेवारी पर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील , परंतु कोणत्याही ठिकाणी मोठा पाऊस पडणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . यांमध्ये पुर्व विदर्भ , पश्चिम विदर्भ , उत्तर महाराष्ट्रात रिमझिम पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

तर राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची स्थिती निर्माण होईल , असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . या दरम्यान शेतीपिकांवर नुकसान होणार नसून , तुर काढणी सुरु असल्यास , तातडीने काढणी करावेत , असे नमुद करण्यात आले आहेत .

Leave a Comment