Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Circular issued regarding submission of outstanding payments of employees ] : सन 2024-25 मध्ये ऑनलाईन प्राप्त थकीत देयके पडताळणी करुन प्रशासकीय मान्यतेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये सादर करणेबाबत , शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 01.01.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सन 2024-25 या आर्थिक वर्षांमध्ये माध्यिमक व उच्च माध्यिमक संबंधित सर्व थकीत देयके संबंधित शाळांनी दिनांक 15.10.2024 पर्यंत शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले होते .
तथापि त्यानंतर शिक्षणाधिकारी / अधिक्षक वेतन व भनिनि पथक सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांनी त्यांचे स्तरावर ऑनलाईन प्राप्त थकीत देयकाची ऑनलाईन पडताळणी करुन संचालयास ऑनलाईन सादर करणे अपेक्षित होते . परंतु अद्यापही अधिक्षक , वेतन पथक व विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणावर थकीत देयके प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे .
ही बाब प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही . तसेच सबब अधिक्षक , वेतन व भनिनि पथक ( माध्यमिक ) सर्व आणि विभागीय शिक्षण उपसांचालक सर्व यांना थकीत देयके नियमानुसार पडताळणी करुन ऑनलाईन सादर करण्यासाठी सन 2024-25 चे थकीत देयके अधिक्षक , वेतन पथक यांना ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक 10.01.2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे .
तर विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांनी वेतन पथक यांचेकडून प्राप्त थकीत देयके पडताळणी करुन ऑनलाईन सादर करण्याचा अंतिम दिनांक 20.01.2025 देण्यात आलेली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.