राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीची कार्यवाही जलदगतीने करणेबाबत परिपत्रक निर्गमित ..

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Circular issued regarding expediting the promotion process of state officers/employees ] : सन 2024-25 निवडसूचीवर्षात पदोन्नती कार्यवाही जलदगतीने करणेबाबत , सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्याचे मा.मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे पदोन्नतीची कार्यवाही जलदगतीने करणेबाबत , निर्देश दिले आहेत .

सदर कार्यवाहीचा जदलगतीने आढावा घेण्यासाठी , पत्रासोबत , जोडण्यात आलेल्या विवरणपुस्तकातील विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांची पदोन्नतीची माहिती 7 दिवसांत सामान्य प्रशासन विभागास उपलब्ध करुन देण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत .

सदरचे परिपत्रक हे राज्य शासनांच्या सर्व उपसचिव ( आस्थापना ) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागास सादर करण्यात आलेले आहेत . यामुळे आता राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पदोन्नती कार्यवाहीस वेग येणार आहे .

राज्यांमध्ये मागील 3 महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता सुरु झाल्याने , राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे कामकाज रखडले गेले होते , आता सदर परिपत्रकानुसार , कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला वेग आला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment