कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक फेस प्रणालीनुसार उपस्थिती बाबत परिपत्रक निर्गमित दि.08.01.2025

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Circular issued regarding attendance of employees as per biometric face system ] : कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक फेस प्रणालीनुसार , उपस्थिती बाबत शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) यांच्या मार्फत दिनांक 08 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शासन निर्णय दिनांक 06 फेब्रुवारी 2023 मधील अट क्र.06 व 12 व शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 मधील अट क्र.05 व 11 नुसार अनुदान पात्र शळांमधील विद्यार्थी , शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी …

यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख ( Face Recognition ) प्रणालीद्वारे नोंदविणेबाबत , निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख ( Face Recognition ) प्रणालीद्वारे उपस्थितीची अट पुर्ण करण्यासाठी सर्व अंशत : अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करण्याऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याबाबतही नमुद करण्यात आले आहेत .

तसेच त्या अनुषंगाने कळविण्यात आले आहेत कि , शासन पत्र दिनांक 13 डिसेंबर 2024 मधील मुद्दा क्र.03,04 व 05 बाबतची माहिती परिपुर्ण यादीसह संचालनालयास दिनांक 13 जानेवारी 2025 पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील शिक्षण उपसंचालक ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) यांच्या मार्फत निर्गमित शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment