Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Chatrapati Shivaji maharaj Krushi Scheme ] : छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना ( मागेल त्याला घटक अंतर्गत ) विविध कृषी योजना राबविल्या जात असून , पात्र शेतकऱ्यांनी आपल्या आवश्यकतानुसार कृषी योजनांचा लाभ घेवू शकतात . यांमध्ये कोणकोणत्या कृषी योजनांचा समावेश होतो , याबाबत पुढीलप्रमाणे माहिती पाहुयात ..

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : या कृषी योजना अंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी पहिल्या वर्षी 50 टक्के , दुसऱ्या वर्षी 30 टक्के तर तिसऱ्या वर्षी 20 टक्के अनुदान मंजुर करण्यात येते . कोण्कण विभागासाठी कमीत कमी 10 गुंठे तर जास्तीत जास्त 10 हेक्टर आणि इतर विभागासाठी कमीत कमी 20 गुंठे तर जास्तीत जास्त 6 हेक्टर क्षेत्र मर्यादेमध्ये लाभ घेवू शकतात . यांमध्ये अत्यल्प भूधारक , महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येतील . फळानुसार मिळणाऱ्या अनुदान दर्शविणारा तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ( प्रति थेंब अधिक पिक -सूक्ष्म सिंचन घटक ) : सदर योजना अंतर्गत नळीद्वारे पिकांस थेंबथेंब पाणी देण्याकरीता केंद्र सरकारकडून अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते . सदरचे सिंचन साहित्य खरेदी करण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिले जाते .

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : या योजना अंतर्गत हरितगृहे , शेडनेट हाऊस , प्लॅस्टिक आच्छादन , प्लास्टिक टनेल , पॉलीहाऊस मधील उच्च दर्जाच्या भाजीपाला लागवड साहित्यासाठी व निविष्ठांसाठी अनुदान , शेडनेट हाऊस मधील उच्च दर्जाच्या फुलपिकांच्या लागवड साहित्यासाठी व निविष्ठांसाठी अनुदान तसेच सेंद्रीय शेती त्याचबरोबर उच्च प्रतिचे फलोत्पादन लागविण्यासाठी पणन सुविधा तसेच शेततळे , वैयक्तिक शेततळे या बाबींकरीता अनुदान दिले जाते .

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान :  या योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण 2 किलोवॅट / हेक्टर पर्यंत वाढविणे करीता ही योजना राबविण्यात येते . ज्या ठिकाणी शेतीमधील उर्जेचा वापर हा कमी आहे , अशा क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणास आर्थिक लाभ देणे हा मुख्य उद्देश आहे . या योजना अंतर्गत ट्रॅक्टर , पॉवर टिलर , ट्रॅक्टर / पॉवर टिल चलित अवजारे , बेल चलित यंत्र / अवजारे , प्रक्रिया संच ,काढणी पश्चात तंत्रज्ञान , फलोत्पादन यंत्र अवजारे , वैशिष्ट्यपुर्ण यंत्र अवजारे , स्वयंचलित यंत्र या कृषी यंत्र खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात केले जाते .

असा करा आवेदन : सदर वरील योजनांपैकी आपणास आवश्यक असणाऱ्या बाबींकरीता ऑनलाईन आवेदन सादर करण्यासाठी राज्याच्या महाडीबीटी फार्मर (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ ) या पोर्टलवर आवेदन सादर करायचे आहेत . आपले नावाची निवड झाल्यास , आपल्याला अनुदानाची रक्कम आपल्या खात्यावर वर्ग करण्यात येते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *