चंदन कन्या योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत ; शेतकऱ्यांना 15 ते 20 लाख रुपये पर्यंतचे आर्थिक लाभ !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Chandan kanya yojana Maharashtra 2024 ] : चंदन कन्या योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत ऑनलाईन नोंदणी सुरु आहे , सदर योजना अंतर्गत चंदनाची लागवड करुन , त्याचा योग्य रित्या सांभाळ केल्याच्या नंतर शेतकऱ्यास एकरकमी 15 ते 20 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते . या योजनाबाबत सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

योजनेचे स्वरुप : या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या बांधावर 20 चंदनाची झाले लावावी लागते , त्या झाडांची 12 वर्षापर्यंत योग्य रित्या सांभाळ केल्याच्या नंतर एकरकमी 15 ते 20 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते . सदर योजना आपल्या कुटुंबामध्ये मुलगी असल्यास , त्याच्या नावे चंदनाची झाडे लावावीत , जेणेकरुन त्याच्या शिक्षणासाठी तसेच लग्नाकरीता 12 वर्षाच्या नंतर आर्थिक सहाय्य मिळेल .

म्हणजेच सदर योजना अंतर्गत ज्या कुटुंबामध्ये मुलगी असेल , अशा शेतकऱ्यांना चंदनाची 20 झाडे मोफत दिली जाते . तसेच सदर चंदन झाडे लागवडीकरीता मार्गदर्शन देखिल दिले जाते . तसेच चंदन झाले लागवड , तोडणी , वाहतुक करीता परवाना देखिल वन विभाग मार्फत दिले  जाते . याशिवाय महाराष्ट्र ग्रोव्हर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत सदर योजना अंतर्गत परिपुर्ण झालेल्या चंदनाच्या झाडाला सर्वोच्च भाव मिळवून दिले जाते .

या योजनाची खास वैशिष्ट्ये :

  • या योजना अंतर्गत कुटुंबातील मुलीच्या लग्नाच्या तसेच शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मिळेल .
  • शेतकरी कुटुंबातील मुलींना चांगले उच्च शिक्षण करता येईल .
  • शेतीच्या बांधावरच 20 झाडांची लागवड करुन त्या झाडांचा 12 वर्षे सांभाळ केल्याच्या नंतर 15 लाख रुपये ते 20 लाख रुपयांचा आर्थिक लाभ मिळेल .
  • सदर योजना अंतर्गत सहभाग घेण्याकरीता 1500/- रुपये सहभाग शुल्क आकारली जाईल .

या योजना अंतर्गत मुलींचया नावे आपल्या तालुका स्तरावर 20 चंदनाची रोपे मिळतील , तर चंदनाची लागवड झाल्याच्या नंतर एक वर्षाच्या नंतर 7/12 वरती नोंद घेतली जाते . तसेच लागवड , कापणी , वाहतुक करण्यासाठी मोफत परवाना काढुन दिले जाते .

💁💁हे पण वाचा : राज्यात गृह विभाग अंतर्गत गृहरक्षक पदाच्या 6500+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

योजना करीता आवश्यक पात्रता : सदर योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार हा शेतकरी असुन त्याच्याकडे शेतजमीन असणे आवश्यक असणार आहेत .तसेच राज्याचे मुळ रहिवाशी , त्यांच्या कुटुंबामध्ये मुलगी असणे आवश्यक असेल , तसेच सदर मुलीचे वय हे 01 ते 10 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे : सदर योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक असतील .

  • अर्जदाराचे आधार कार्ड , मुलीचे आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला , मुलीचा जन्माचा दाखला , पासपोर्ट फोटो , जमिनीचा 7/12 , शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र ..

लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी कराल ? : या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी 7038443333 या मोबाईल नंबर वर मिस कॉल अथवा व्हॉट्सअप मॅसेज करावेत .. अथवा आपल्या जिल्हा / तालुका  वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा ..

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Comment