आता शेतकरी होवू शकतील करोडपती ; फक्त करावी लागेल या पिकाची लागवड ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Chandan Farming information ] : आता शेतकरी देखिल करोडपती होवू शकणार आहेत , फक्त शेतकऱ्यांना वेगळ्या पिकांची लागवड करावी लागणार आहेत , या प्रकारच्या शेतीला सरकारकडून देखिल अनुदान मिळते . ही शेती नेमक्या कोणत्या पिकाची आहे , कशी करावी लागते , करोडपती कसे होता येते , याबाबत सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे घेवूयात ..

सध्या शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीमधील उत्पादन क्षमता वाढीवर अधिक लक्ष देत आहे . परंतु शेतीमध्ये हवा तसा नफा मिळण्याचा प्रमाण कमी असतो , लागवड / पेरणी / काढणी यांचा विचार केला असता , शेतकऱ्यांच्या पदरी साधारणपणे 50 ते 70 टक्के इतका नफा होतो . तर काही वेळा वातारणाने साथ न दिल्यास लागवडीचा खर्च देखिल निघत नाहीत , यामुळे शेतकऱ्यांने शेतीमध्ये नवनविन प्रयोग करुन पाहिले पाहिजे .

चंदन लागवडीची शेती : आपण जर चंदनांच्या झाडांची लागवड केल्यास , निश्चितच आपणांस करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही . चंदनाची झाले लावल्यास , त्यांमध्ये आंतरपीके देखिल घेता येतील , यामुळे डब्बल उत्पन्न होईल . या चंदनाची शेती प्रामुख्याने दक्षिण भारतांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते . तर सध्या चंदनाच्या बियाणांमध्ये आधुनिक पद्धतीने सुधारणा केल्याने , देशातील इतर प्रदेशांमध्ये देखिल याची लागवड केली जावू शकतो .

चंदनाची झाले करोडपती कसे बनवेल ? : चंदनाच्या झाडाची पुर्ण लागवड होण्याकरीता निदान 10 ते 15 वर्षे इतका अवधी लागतो  , तर एका पुर्ण वाढलेल्या झाडांपासून आपणास 2,00,000/- रुपये इतके उत्पन्न मिळेल ,तर आपण जर फक्त 50 झाडे लावली तर 15 वर्षांमध्ये आपणांस 2 लाख प्रमाणे 1 करोड इतके उत्पन्न मिळेल .

चंदनाची लावगवड करण्याकरीता मातीचा पीएच हा 4.5 ते 6.5 इतका असायला हवा , यामुळे प्रथम माती परिक्षण करुन घेणे आवश्यक असेल . एक झाड आपल्याला 100/- रुपयांस कोणत्याही नर्सरीमधून प्राप्त होईल . यामुळे चंदनाची निदान बांधावर जर लागवड केल्यास , करोडपती होण्याचे स्वप्न पुर्ण होईल .

Leave a Comment