Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Chance of hail in “these” 25 districts ] : राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे , या संदर्भात हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी नवा अंदाज व्यक्त केला आहे .
राज्यामध्ये दिनांक 26 डिसेंबर पर्यंत ढगाळ वातावरणसह थंडीचे प्रमाण कमी होऊन उबदारपणा जाणवेल . यामुळे पावसाला पोषक वातावरणाची निर्मिती होणार आहे . यामध्ये राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
तर दिनांक 27 डिसेंबरला खाली नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे , सदर गारपीट राजस्थानमध्ये वाहत असणाऱ्या थंड कोरडे चक्रीय वाऱ्यांची तसेच अरबी समुद्रातील नैऋत्य दिशेकडून तर पश्चिम उपसागरातून पूर्व दिशेने येणाऱ्या आर्द्रता युक्त वाऱ्यामुळे सदर गारपीटीची निर्मिती होत आहे .
या 25 जिल्ह्यांमध्ये होणार गारपीट : हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार , राज्यात मराठवाडा मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भातील सर्व जिल्हे असे एकूण 25 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपातील गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
या 11 जिल्ह्यांमध्ये गारपिटीची मोठी शक्यता : वरील नमूद 25 जिल्ह्यांमध्ये किरकोळ स्वरूपाची गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून , विशेषतः छत्रपती संभाजीनगर , नाशिक, जळगाव , धुळे , नंदुरबार , अमरावती , अकोला , नागपूर , वर्धा , गोंदिया , वाशिम “या” 11 जिल्ह्यांमध्ये गारपीटीची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .