Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Chanakya Niti About couple Fight ] : चाणक्य नितीमध्ये अनेक प्रश्नांचे समाधान सांगण्यात आलेले आहेत , यापैकी पती -पत्नी मध्ये होणारे भांडणे याबाबत करावयाचे उपाय जणेकरुन कधीही कलह होणार नाहीत , याबाबत सांगण्यात आलेले आहेत . भांडण / कलह थांबविण्यासाठी चाणक्य नितीमध्ये सांगण्यात आलेले सविस्तर उपाय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
आदर करावा : पती -पत्नीने एकमेकांचा आदर करायला पाहिजे , जेणेकरुन दोघांना देखिल समान सन्मानाची भावचा आदर होईल , ज्यामुळे दोघेही एकमेकांची उणिवा दुर करण्याकरीता प्रयत्न करतील . एकमेकांचा आदर केल्याने मानुसकी अधिक वाढते , ज्यामुळे संसारामध्ये भांडणे / कलह कमी प्रमाणात होतात .
चर्चेतुन समाधान काढावेत : एखाद्या गोष्टीवरुन पती – पत्नीमध्ये भांडणे झाल्यास अशा वादाचे निराकरण करण्यासाठी चर्चेमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा , जेणेकरुन एकमेकांतील गैरसमज दुर होतील , तसेच बोलून प्रश्न सुटत असतात , यामुळे नेहमीच चर्चेतुन समाधान काढण्याचा प्रयत्न करावा .
क्षुल्लक गोष्टीवर वाद घालणे टाळावेत : पती-पत्नीने नेहमी क्षुल्लक गोष्टीवर वाद घालणे टाळावेत , शिवाय आपल्या संसाराशी संबंध नसलेल्या गोष्टीवर भाष्य / विवाद करणे टाळावेत . ज्यामुळे निरर्थक गोष्टींवरुन वाद होवू शकतो .
पत्नीची नेहमी स्तुती करावी : पतीसाठी त्याची पत्नी ही परी असते , तर भोजनांमध्ये ती अन्नपुर्णा असते , तसेच महिलांना त्यांची स्तुती केलेली खुप आवडते म्हणून पुरुषांने नेहमीच त्यांची सुंदरतेची तसेच भोजनांची स्तुती केली पाहीजे . जर पुरुषांने पत्नीची स्तुती केल्यास , अनेक वाद यातुनच मिटतात .