बजेट 2024 मध्ये कर्मचाऱ्यांना नेमके काय मिळाले ? पाहा सविस्तर !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Central Government Last Budget 2024 ] : मोदी सरकारचे हे शेवटचे बजेट वित्त मंत्री निर्मला सितारमण यांनी दिनांक 01 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत सादर केले . यांमध्ये देशातील जनतेसाठी विविध योजना , उपक्रम या साठी आर्थिक तरतुद करण्यात आली आहे .

सरकारी कर्मचाऱ्यांना नेमके काय मिळाले ? : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्यासाठी विशेष तरतुद करण्यात आलेली आहे . सदर अंगणवाडी व आशा वर्कर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे . यामुळे देशातील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर कर्मचाऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईन दिलासा मिळालेला आहे .

कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी 312 कोटीची तरतुद : सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता भारत आणि परदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा करीता 312 कोटी इतक्या रक्कमेची तरतुद करण्यात आलेली आहे तर प्रशिक्षण योजना करीता 120.56 कोटी रुपये तर राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता निर्माण कार्यक्रम करीता 120.56 कोटी रुपये इतक्या निधीची तरतुद करण्यात आलेली आहे .

सरकारी कर्मचाऱ्यांना या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात अपेक्षा होती , परंतु सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे . कारण कर्मचाऱ्यांना ह्या बजेटमधून जे अपेक्षित होते , ते मिळालेच नाहीत . या अर्थसंकल्पांमध्ये देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बाबत तोडगा निघेल अशी अपेक्षा होती , परंतु जुनी पेन्शन बाबत कोणतीही तरतुद करण्यात आलेली नाही . त्याचबरोबर नविन वेतन आयोग लागु करणेबाबत , आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात आली नाही . यामुळे देशातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी दिसून येत आहेत .

महागाई भत्ता वाढीबाबत तरतुद नाही : सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासून डी.ए मध्ये वाढ करण्याची मोठी अपेक्षा होती , परंतु डी.ए वाढीसाठी केंद्रसरकारकडून कोणत्याही प्रकारची तरतुद करण्यात आलेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजगी दिसून येत आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment