Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Central Government budget 2024 ] : केंद्र सरकारचे दिनांक 23 जुलै 2024 रोजी वित्त मंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प जाहीर केले , या अर्थसंकल्पांमध्ये सर्व गटातील नागरिक , शेतकरी , कर्मचाऱ्यांसाठी तरतुद करण्यात आली . यामध्ये देशातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेमकी कोणती तरतुद करण्यात आली आहे , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे घेवूयात ..
NPS मधील कर्मचाऱ्यांच्या योगदानांमध्ये वाढ : कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांचे योगदानाची रक्कमेत 10 टक्के वरुन 14 टक्के अशी वाढ करण्यात आली आहे . यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये कमी पगार पडणार असून , एनपीएस खाती अधिक रक्कम जमा होणार आहे . तर सदर 14 टक्के रक्कम करातुन सुट मिळणार आहे .
सदरची रक्कम ही कर्मचारी कलम 80 CCF 2 अंतर्गत त्यांच्या योगदानावर कर सवलतीचा दावा मिळवू शकतील .त्याचबरोब एनपीएस टायर 01 मधील संपुर्ण रक्कम ही करमुक्त असून , सदर टायर 01 मधून 25 टक्के पर्यंत काढण्यात आलेल्या रक्कमेवर कर सवलत मिळेल .
नविन कर रचना : सदर अर्थसंकल्पांमध्ये कर्मचाऱ्यांना स्टँडर्स डिडक्शन 50 हजार रुपये भरून 75 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे . नवीन टॅक्स प्रणाली पुढील प्रमाणे आहे ..
* 3 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त असणार आहे .
* 3 लाख लागते 7 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्नावर 5% इतकी आयकर आकारले जाणार आहे .
* 7 लाख ते 10 लाख रुपये पर्यंतच्या उत्पन्नावर 10% आयकर आकारले जाणार आहे .
* 10 लाख ते 12 लाख रुपये उत्पन्नावर 15% इतके आयकर आकारले जाणार आहेत .
* 12 लाख ते 15 लाख रुपये उत्पन्नावर 20% आयकर आकारले जाणार आहेत .
* 15 लाख रुपये वरच्या उत्पन्नावर 30 टक्के इतके आयकर आकारले जाणार आहेत .