Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ central employee mahagai Bhatta vadh news ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे , ती म्हणजे महागाई भत्तांमध्ये आणखीण 5 टक्के पर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
01 जुलै 2024 पासुन डी.ए मध्ये 5 टक्के वाढ : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे 01 जुलै 2024 पासून महागाई भत्ता मध्ये आणखीण 5 टक्क्यांची वाढ होवू शकते , डी.ए वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे ठरविण्यात येते , मिडीया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे परत केंद्रीय कर्मचाऱ्यांना डी.ए मध्ये 5 टक्के वाढ होईल , ज्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा एकुण डी.ए हा 55 टक्के इतका होईल .
वर्षातुन दोनदा डी.ए मध्ये वाढ : सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये वर्षातुन दोनदा वाढ होत असते , माहे जानेवारी 2024 पासून डी.ए मध्ये 4 टक्क्यांची वाढ लागु केल्याने , केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकुण डी.ए हा 50 टक्के इतका झालेला आहे , तर आता 01 जुलै 2024 पासुन परत सहामाहीचा महागाई भत्ता वाढ केला जाईल .
डी.ए वाढीमुळे घरभाडे भत्ता मध्ये देखिल होणार वाढ : घरभाडे भत्तामधील वाढ ही डी.ए वाढीवर अवलंबून आहे , ज्यावेळी डी.ए चे दर हे 25 टक्के होते ,त्यावेळी एचआरए मध्ये सुधारणा करण्यात आली तर , आता डी.ए चे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक होईल , त्यावेळी घरभाडे भत्तामध्ये वाढ लागु करणे अपेक्षित आहेत . सदर घरभाडे भत्तांमध्ये अनुक्रमे 10 टक्के , 20 टक्के , 30 टक्के अशी सुधारणा करण्यात येणार आहे .
तसेच वाहन भत्तामध्ये देखिल वाढ होईल , तर सदर वाढीव महागाई भत्ताचा लाभ हा सेवानिवृत्त पेन्शनधारक तसेच कुटुंबनिवृत्त वेतन धारकांना देखिल लागु होईल ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.