राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 53% वाढ प्रलंबित असताना , केंद्रीय कर्मचाऱ्यांना 59% DA वाढीची चाहूल !

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ central employee DA vadh upto 59% update ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासून 03 टक्के महागाई भत्ता  (DA) वाढ विधानसभा निवडणुकीमुळे प्रलंबित आहे . अशातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखीन 06 टक्के महागाई भत्ता वाढीची चाहूल लागली आहे .

केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वेळेवर देय भत्ते दिले जाते . यामध्ये महागाई भत्ता वेळेवर लागू करण्यात येतो. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून 02 वेळेस जानेवारी व जुलै या महिन्यात महागाई भत्ता (DA ) वाढ दिली जाते . जुलै 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना 03 टक्के महागाई भत्ता वाढ देण्यात आली . याबाबत केंद्र सरकारकडून त्वरित निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ फरकासह देण्यात आला .

परंतु राज्यामध्ये विधानसभेच्या आचारसंहिता सुरू झाल्याने , राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) वाढीपासून अद्याप पर्यंत वंचित राहावे लागत आहे . याबाबतचा निर्णय लवकरच होईल ,  असे असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 6% DA वाढीची चाहूल लागली आहे .

मागील तीन महिन्यात अमेरिकेतील निवडणुका तसेच चीनचे नवीन आर्थिक धोरण यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम दिसून आले आहेत .यामुळे महागाईचा टक्का अधिकच वाढला आहे , ज्यामुळे जानेवारी 2025 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये मोठी वाढ दिसून येईल .

ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे सदर महागाई भत्त्याची टक्केवारी 6% ने वाढण्याची शक्यता तज्ञाकडून व्यक्त केली जात आहे . यामुळे केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जानेवारी 2025 पासून 59% दराने महागाई भत्ता लाभ मिळू शकेल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment