Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ casual leave rules ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना अचानक आपत्कालीन कामाकरिता जी रजा दिली जाते त्या रजेला नैमित्तिक / किरकोळ रजा असे संबोधले जाते . ही रजा अत्यंत गरजेची बाब असताना काढली जात असते .
किरकोळ रजा 01 जानेवारी ते 31 डिसेंबर या कॅलेंडर वर्षामध्ये 08 दिवस साधारणपणे एकावेळी तीन दिवसापेक्षा जास्त नाही अशा स्थितीत दिली जाते . तर अपवादात्मक स्थितीमध्ये दहा दिवसा ही रजा वाढवता येते . किरकोळ रजा हे शक्यतो बिनपगारी नसते केली जात नाही .
तर सदरची रजा नाकारणे , अथवा रद्द करणे अशी तरतूद रजा नियमांमध्ये नसल्याने , प्रसंगी अर्ज नसला तरीही किरकोळ रजा कार्यालय प्रमुख नाकारू शकत नाही . कारण आपत्कालीन स्थितीमध्ये , निकड लक्षात घेता सदर रजेचा अर्ज नंतर दिला जाऊ शकतो .
सदर रजा ही रजेचा प्रकार नसल्याने , अर्जित रजा अथवा अन्य प्रकारच्या रजेला किरकोळ रजा जोडून घेता येत नसते . अथवा किरकोळ रजेला जोडून अर्जित किंवा अन्य प्रकारच्या रजा घेता येत नसतात . परंतु सध्याची रजा सार्वजनिक सुट्टी जोडून घेता येते तर सेवा पुस्तकांमध्ये याची नोंद घेणे आवश्यक नसते , यासाठी स्वतंत्र नोंदवही कार्यालय प्रमुखांकडून ठेवली जाते
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.