लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना मोटार वाहन तसेच कार खरेदी करण्यासाठी अग्रिमे मंजुर करण्यात येत असतात , यापुर्वी ह्या अग्रिमावर अल्प व्याजदर स्विकारण्यात येते . या संदर्भात काही अटी / शर्ती मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे , या संदर्भातील सुधारित GR (शासन निर्णय ) पुढीलप्रमाणे पाहुयात …
सदर अग्रिमाची रक्कम ही वाहनाची प्रत्यक्षात असणारी किंमत कमी असेल तर उर्वरित रक्कम ही शासनास परत करावी लागेल तर वाहनांची किंमत जर अग्रिमापेक्षा जास्त असल्यास , कर्मचाऱ्यांस उर्वरित रक्कम भरावी लागेल .सदर अग्रिमाची रक्कम ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना मंजुर करण्यात आलेली आहे ,त्याच कर्मचाऱ्यांना अग्रिम देय होईल .
मोटार कार / मोटार स्कुटर , मोपेड खरेदी करण्यासाठी अग्रिम हे कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळांमध्ये फक्त एकाच वेळेसे अग्रिम मंजुर करण्यात येईल .सदर अग्रिमांची वसूली ही वाहन प्रकारानुसार भिन्न आहे . यांमध्ये मोटार सायकल खरेदी अग्रिम घेतली असल्यास त्याची वसूली ही पुढील 48 समान मासिक हप्त्यांमध्ये , तर मोपेड अग्रिमाची वसूली ही पुढील 30 समान हप्त्यांमध्ये तर मोटार कार खरेदी अग्रिमांची वसूली 100 समान मासिक हप्त्यात वसूली करण्यात येते .
सदर अग्रिमांची रक्कम ही व्याजासह वसूल करण्यात येते , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.13 ऑगस्ट 2020 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , मोटार कार खरेदीवर 11.5% तर मोटार सायकल , मोपेड , तीन चाकी स्वयंचलित सायकल खरेदी अग्रिमावर 9 टक्के व्याज आकारण्यात करण्यात येते . तर दुचाकी सायकल खरेदी अग्रिम हे व्याजरहीत अदा करण्यात येते .
या संदर्भात कार खरेदी , दुचाकी मोटार सायकल , दुचाकी सायकल , मोपेड खरेदी अग्रिमाबाबत निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
आपण जर शासकीय , निमशासकीय , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !