राज्य शासनांकडून माता – भगीनींच्या सन्मानासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना राबविण्यास सुरुवात ..

Spread the love

Live Marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ Captive Market Scheme ] : राज्यातील माता – भगीनींच्या सन्माकरीता राज्यांमध्ये वस्त्रोद्योग विभाग मार्फत कॅप्टिव्ह मार्केट योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे . या योजना अंतर्गत माता- भगिनींना एक साडी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .

या कॅप्टिव्ह मार्केट योजना अंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबामधील माता भगिनींच्या सन्माकरीता प्रत्येक कुटुंब याप्रमाणे दरवर्षीला एक साडी मोफत देण्याकरीता वस्त्रोद्योग विभागाकडून सदर योजनास सुरुवात करण्यात आलेली आहे . सदर योजना अंतर्गत राज्यांमध्ये तब्बल 24 लाख 80 हजार इतके अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबामधील माता – भगिनींना साड्यांचा लाभ प्राप्त झालेला आहे .

राज्यातील शेतकऱ्यांच्या कापसाला मागणी वाढवी तसेच राज्यातील सुतगिरणींच्या सुताला भव व स्थानिक यंत्रमागधारकांना रोजगार उपलब्ध व्हावा व अंत्योदय शिधापत्रिका कुटुंबातील माता – भगिनींच्या सन्मानासाठी या योजनाची सुरुवात करण्यात आलेली आहे .

सदर योजना अंतर्गत माता – भगिनींना साड्यांचा पुरवठा करण्याकरीता दिनांक 11 मार्च 2024 पर्यंत 100 टक्के साड्यांचा पुरवठा करण्यात आलेला आहे , तर शिल्लक असणाऱ्या साड्यांचे त्वरीत वितरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर साड्या लाभार्थ्यांना राशन दुकानातुन प्राप्त होणार आहेत .

काही ठिकाणी खराव तसेच फाटलेल्या साड्या मिळाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने , खराब साड्या मिळाल्यास , साड्या बदलून दिल्या जाणार आहेत , तसेच न झाल्यास लाभार्थ्यांनी 022-27703612 या नंबर वर कार्यालयीन वेळ 9.45 ते सायं.6.15 या कालावधीत तक्रार करायची आहे , अथवा info@mspc.org.in या मेलवर तक्रार करायची आहे .

Leave a Comment