Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [  Can unmarried couples be arrested in OYO hotels? ] : ओयो हॉटेल हा एक प्रकारचे अविवाहीत प्रेमयुगलकांसाठी हक्काचे राहण्याचे ऑप्शन आहे . परंतु याच हॉटेलमध्ये राहण्यासाठी कोणते कायदे आहेत , याबाबत आपणांस माहिती असणे आवश्यक आहे .

ओयो ने नुकतेच बदले केलेला नियम : ओयो संलग्नित मेरठ शहरातील सर्व हॉटेल्स करीता नियमात बदल केला असून , मेरठ शहरात केवळ विवाहीत जोडपेच राहू शकतील अशी सुधारित तरतुद करण्यात आली आहे . याकरीता मेरठ शहरात ओयो हॉटेल्स मध्ये राहण्यासाठी विवाहीत असल्याबाबतचा पुरावा सादर करावा लागणार आहे .

संविधानातील कलम 21 नुसार नागरिकांना स्वातंत्र्य : संविधानातील कलम 21 अंतर्गत सदर ओयो हॉटेल्स मध्ये 18 वर्षापेक्षा अधिक जोडप्यांना कायदेशिर रित्या कोणत्याही हॉटेल्स मध्ये राहण्याचे स्वातंत्र्य आहे . अशा जोडप्यांना अटक केली जावू शकत नाही .

परंतु यांमध्ये दोघांच्या संमती असणे आवश्यक असेल . अशा वेळी पोलिसांकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करु शकत नाहीत . याबाबत न्यायालयाने देखिल सन 2019 मध्ये दिलेल्या निर्णयात सकारात्मक निर्णय दिलेला आहे .

याकरीता जोडप्यांकडे कायदेशिर कागदपत्रे सोबत असणे आवश्यक असेल , यांमध्ये ओळखीचा पुरावा , वयाचा पुरावा सोबत असणे आवश्यक असेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *