Live marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ cabinet nirnay dated 30.09.2024 ] : काल दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत . विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सदरचे राज्यातील जनता , व्यापारी , कर्मचारी यांना खुश करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत .
देशी गायींच्या पालन करीता अनुदान : देशी गायींच्या पालन – पोषण करीता प्रति गायीसाठी 50,000/- रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे . या संदर्भातील अंमलबजावणी ही राज्य गोसेवा आयोग मार्फत केली जाणार आहे . गोशाळांना परवडत नसल्याने , सदरचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .
राज्यात नविन बंधाऱ्यांच्या कामांस मान्यता : राज्यातील लातुर जिल्ह्यातील हासाळा , पेठ , तसेच कव्हा या बंधाऱ्यांचे कोल्हापुर बॅरेजमध्ये विस्तार तसेच सुधारण करण्यास सदर मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे .
आता मुंबईत झोपडीधारकांसाठी भाडेतत्वावरील घरे योजना : धारावीमधील झोपडीधारकांसाठी भाडेतत्वावरील घर उपलब्ध करुन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे . या निर्णयानुसार , क्रेडीट लिंक सबसिडी अंतर्गत राज्य शासनावर कोणत्याही प्रकारचे दायित्व येणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
शेतकऱ्यांना लाभ : राज्यातील अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध शेतकऱ्यांकरीता कृषी स्वावलंबन योजनांच्या अंतर्गत आर्थिक निकष वाढविण्यास मंजुरी देण्यात आले आहे . यानुसार नविन विहीर करीता ४ लाख रुपये तर जुन्या विहीरीच्या दुरुस्ती कामाकरीता १ लाख रुपये अनुदान तर सोलार पंप , तुषार सिंचन , ठिबक सिंचन तसेच प्लास्टिक अस्तरीकरण , पीव्हीसी पाईप , एचडीपीई करीता ९० टक्के अनुदान अथवा ५० हजार रुपये जे कमी असेल ते अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .
इतर महत्वपुर्ण निर्णय : सोनार समाजाच्या आर्थिक विकासासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
- जामखेड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीस अर्थसहाय्य
- नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालय हे आता राज्य शासनांच्या नियंत्रणाखाली वर्ग .
- आयुर्वेद तसेच युनानी महाविद्यालयातील पदभरतीकरीता निवड समितीचे गठण
- राज्यातील आखणीन 26 ITI चे नामकरण
- आर्य वैश्य समाजाच्या आर्थिक विकासाकरीता श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडाळाची स्थापना
- श्री सिद्धीविनायक गणपती मंदीर समितीवर आता 15 सदस्य
- बाटीच्या धर्तीवर आता गोर बंजारा समाजाकरीता वनार्टी स्वायत्त संस्थाची स्थापना
- मेट्रो – 3 प्रकल्प ग्रस्तंना मुद्रांक शुल्कांमध्ये सवलत
- पंचगंगा नदी प्रदुषण रोखण्याकरीता सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
- शासन हमी शुल्क दर कमी करण्याचा निर्णय
- सैनिकी शाळांकरीसाठी राज्यात आता सुधारित धोरण
- चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा येथे भाजीपाला संशोधन केंद्र
- महसुली वाढीकरीता मुद्रांक अधिनियमांत सुधारणा
- नागरपुर येथील मिहान प्रकल्पास निधी देण्यास मंजूरी
- ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प कामास मंजूर , 12,220/- कोटी रुपये खर्चास मान्यता
- ठाणे ते बोरीवली भुयारी मार्गाकरीता 18,800/- कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी