Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ Cabinet nirnay dated 14 October 2024 ] : दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती . यामध्ये विविध 15 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आली आहेत , सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते , सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

हलक्या वाहनाकरिता टोल माफ : मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गावरील टोल हलक्या वाहनाकरिता माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे . यामध्ये एसटी बसेस , शाळेच्या बसेस , हलकी वाहने यांना सदर पथ करामधून , सूट देण्यात आले आहेत .

नदीजोड योजनेस मान्यता : दमणगंगा एकलहरे गोदावरी नदी जोड योजनेस त्याचबरोबर दमरगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड योजनेस मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे . याकरिता मराठवाड्यातील दमनगंगा एकलहरे गोदावरी या योजनेतून तब्बल 10 हजार 11 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ उपलब्ध करून दिल्या जाणार आहे .

कौशल्य विद्यापीठात रतन टाटा यांचे नाव : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ यास रतन टाटा यांचे नाव देण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे . रतन टाटा यांच्या स्मरणार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे .

शेती महामंडळाची जमीन MIDC ला हस्तांतरण : पुणे जिल्हा येथील मौ. जंक्शन , मौ. भरणेवाडी ,मौ. लासुरणे , मौ. अंथरणे येथील तब्बल 131 हेक्टर 50 आर अशी राज्य शेती महामंडळाची जमीन MIDC ला हस्तांतरित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे .

इतर महत्त्वपूर्ण निर्णय : आगरी समाजाच्या विकासाकरिता आगरी समाज महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी .

  • समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ऍडव्हान्समेंट योजना लागू करण्यास मंजुरी .
  • वैजापूर येथील शनिदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता देण्यास मंजुरी .
  • पाचपाखाडी येथील जमीन ठाणे महानगरपालिकास प्रशासकीय भवनाकरिता देण्यास मंजुरी .
  • खिडकाळी येथील जमीन हायब्रीड स्किल विद्यापीठात विनामूल्य देण्याचा निर्णय .
  • पुणे मेट्रो रेल टप्पा क्र.02 मधील रेल्वे मार्गीकांच्या कामास मान्यता .
  • किल्लारी येथील शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज समान हप्त्यात परतफेड मंजुरी .
  • अडचणी मधील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय .
  • मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तात्काळ मेडिसिनची तीन पदे निर्माण करण्यास मंजुरी .
  • खंड क्षमापित करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मंजुरी
  • अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास महामंडळाकरिता अभ्यास गटाची स्थापना .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *