दि.07.01.2025 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 02 महत्वपुर्ण निर्णय !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cabinet nirnay dated 07 January 2025 ] : दिनांक 07 जानेवारी 2025 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये 02 महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत . दोन्ही निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात .

राज्यात दिनांक 01 एप्रिलपासुन फास्ट टॅग अनिवार्य : दिनांक 01 एप्रिल 2025 पासुन राज्यातील रस्त्यावरील पथकर करीता फास्ट टॅग अनिवार्य करण्या आला आहे . सदर निर्णर्यानुसार , सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण 2014 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे .

रोड टॅक्स वसुली मध्ये अधिक सुसूत्रता तसेच पारदर्शकता यावी याकरीता सदर निर्णय घेण्यात आला आहे . या निर्णयानुसार , जर फास्ट टॅग सुरु नसेल अथवा टॅगशिवाय वाहने फास्ट टॅगच्या मार्गेत प्रवेश केल्यास , अशा वाहनांना दुप्पट पथकर भरावा लागणार आहे .

प्रशासकीय कामकाजाकरीता सुधारित महाराष्ट्र शासन कार्यनियमावली : राज्याच्या प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ व्हावा व गतिमान करणारी सुधारित कार्यनियमावली प्रसिद्ध करण्यास सदर मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे .

सदर कार्यनियमावली प्रथम 1975 साली तयार करण्यात आलेली होती , सदर सुधारित कार्यनियमावली राज्यपाल यांच्या मान्यतेनंतर शासन राजपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे . तसेच शासनांचा कारभार अधिक पारदर्शक तसेच गतिमान व लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे . सदर सुधारित कार्य नियमावली अंतर्गत 48 नियम , 4 अनुसुची व 01 जोडपत्र असून , सदर कार्यनियमावली 09 भागांमध्ये विभागली आहे .

Leave a Comment