Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cabinet nirnay dated 04 October ] : राज्य विधानसभेच्या निवडणूकांच्या अनुषंगाने राज्यात केव्हांही आचार संहिता लागु शकते , यामुळे राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत दिनांक 04 ऑक्टोंबर 2024 झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत 33 मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत .

राज्यातील समाजानुसार आर्थिक विकास महामंडळे : राज्यात समजानुसार आर्थिक विकासाकरीता जैन , बारी , तेली , हिंदु खाटीक , लोणारी समाजाकरीता महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे , यामुळे सदर समाजातील लोकांचे आर्थिक विकास होण्यास सहाय्यभूत ठरणार आहे .

अकृषिक कर माफ : राज्यामधील अकृषिक कर पुर्णपणे माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे , सदर निर्णयानुसार गावठाण बाहेर असणाऱ्या घरांची संख्या वाढत असल्याने तसेच शहरी भागांमध्ये मोठ्या इमारती होत असल्याने , अशा जमिनींवरील अकृषिक कर रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे .

बंजारा – लमाण तांडा ग्रामपंचायत करीता लोकसंख्याची अट शिथिल : राज्यांमध्ये बंजारा , लभाण , लमाण तांड्यांमध्ये ग्रामपंचायत स्थापनेकरीता लोकसंख्येची अट शिथिल करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . ग्रामपंचायत स्थापनेकरीता लोकसंख्या ही 1000 इतकी असून सदर निर्णयाने अट शिथिल केल्याने आता 700 लोकसंख्या असणाऱ्या तांड्यांमध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्यात येणार आहे .

इतर महत्वपुर्ण निर्णय : राज्यात भू-जलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्यास मंजूरी .

  • मृदा व जलसंधारण विभाग मार्फत कोल्हापुर जिल्हा मधील आजरा तालुका अंतर्गत  वेळवट्टी , गवसे व घाटकरवाडी येथून बंदिस्त पाईपलाईन टाकण्यास मंजूरी .
  • कोल्हापुर येथील कागल तालुक्यातील सांगाव येथे शासकीय होमिओपॅथी व रुग्णालय स्थापन करण्यास मंजुरी .
  • राज्यात सागरी मच्छीमार ककरीता कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास मंजूरी .
  • जिल्हा सिंधुदुर्ग येथे कुडळा तालुका मधील डोंगरेवाडीत साठवण तलाव स्थापनेस मंजूरी .
  • गाळमुक्त धरण तसेच गाळयुक्त शिवाय योजनास कायमस्वरुपी राबविण्यास 2,604/- कोटी रुपये खर्चास मंजूरी .
  • राज्यांमध्ये हरीत एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्यास 160,000/- कोटी गुंतवणूकीस मंजुरी ..
  • उच्च व तंत्रज्ञान वरील अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा , व अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन .
  • राळेगण सिद्धी येथे उपसा सिंचन योजनेकरीता सक्षमीकरण .
  • शिरोळ तालुक्यामधील गावात भूमिगत चर योजना राबविण्यास मंत्रीमंडळाची मंजूरी .
  • बौद्ध समजाच्या सांस्कृतिक तसेच शैक्षणिक संस्थांना 10 लाख रुपये अनुदान देण्यास मंजूरी .
  • सोलापुर – मुंबई हवाई मार्ग करीता व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी .
  • इंदापुर येथे न्यायालये स्थापन करण्यास मंजुरी , तसेच बुलढाणा येथे नविन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय स्थापन करण्यास मंजूरी .
  • महसूल न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष तसेच सदस्य नियुक्तीकरीता जाहीरातीद्वारे अर्ज प्रक्रिया .
  • पुणे दौंड येथील बहूउद्देशिय सभागृह करीता शासकीय जमीन देण्यास मंजूरी .
  • नाशिक , त्र्यंबकेश्वर मधील ब्राम्हणवाड येथील किकवी प्रकल्पाच्या कामास मंजुरी .
  • टेंभू सिंचन योजनास आता स्व.अनिलभाऊ बाबर यांचे नाव देण्यास मंजूरी .
  • छ.संभाजीनगर जिल्ह्यातील पुर्णा नदीवर 10 साखळी बंधाऱ्यांच्या कामांस गती .
  • ऐतिहासिक तसेच प्राचीन वास्तुंचे नुकसान केल्यास आता यापुढे 02 वर्षांची तुरंगवास तर 1 लाख रुपये दंडाची तरतुद .
  • राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरीता पारितोतिषांच्या रक्कमेत मोठी वाढ करण्यास मंजूरी .
  • संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबविण्यास मंजूरी .
  • राज्यामधील लहान जलविद्युत प्रकल्प बांधा वापरा व हस्तांतरण धोरण राबविण्यास मंजुरी .
  • कोकण व पुणे विभाग करीता एसडीआरएफच्या 02 कंपन्याला मंजुरी .
  • राज्यांमध्ये आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यास मंजुरी .
  • पुणे रिंग रोड प्रकल्प कामांस मान्यता .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मंत्रीमंडळ निर्णय पाहण्यासाठी Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *