दि.02.01.2025 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cabinet nirnay ] : दिनांक 02 जानेवारी 2025 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत 03 महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत . यांमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन / भत्ते बाबत तसेच आधार कार्डाच्या धर्तीवर युनिक आयडी व आकारी पड बाबतीच तीन महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत .

आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 220 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे , तर शासकीय थकबाकीपोटी लिलाव होवून सरकारजमा झालेल्या आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत .

प्रचलित बाजारमूल्याच्या 25 टक्के रक्कम वसूल करुन मूळ खातेदारांना अथवा त्यांच्या वारसांना जमीन परत करण्याची तरतुद करण्यात आलेली आहे . यामुळे छोट्या व अल्प भूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे .

आधारकार्डाच्या धर्तीवर प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाकरीता युनिक आयडी : युनिक आयडीमुळे त्याच त्याच विकास कामांची पुनरावृत्ती टाळता येणार आहेत , तसेच कोणत्या भागात , कोणत्या कामाचे नियोजन केले आहेत , व कोणत्या प्रकल्पाची गरज आहे , हे एकत्रितपणे एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध होणार आहे तसेच संतुलित विकास साधला जावून निधी व श्रमशक्तीचा सुयोग्य वापर व पीएम गतिशक्ती पोर्टल , ग्रामविकास पोर्टल , महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटरवर ही माहिती एकिकृत असणार आहे .

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन , भत्यांसाठी मुंबई जिल्हा बँकेत खाते उघडण्यास मान्यता : शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा बँकेत खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे . तसेच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीसाठी खाते उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . तसेच निवृत्तीवेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .

Leave a Comment