Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cabinet ministry nirnay dated 30 july ] : दिनांक 30 जुलै 2024 रोजी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत . सदर मंत्रीमंडळ बैठक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . घेण्यात आलेले महत्वपुर्ण निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात …

वसतिगृहे तसेच आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रति विद्यार्थी अनुदानांमध्ये वाढ : राज्यातील सामाजिक न्याय , आदिवासी विकास , महीला व बालविकास तसेच इतर मागास बहुजन कल्याण , दिव्यांग कल्याण या विभाग अंतर्गत येणाऱ्या स्वयंसेवी संस्थाच्या अनुदानित संस्थामधील विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रति विद्यार्थी परिपोषणन अनुदानांमध्ये आता प्रति महिना 1500/- रुपये वरुन 2200/- रुपये इतके करण्यात आले आहेत . तर एड्सग्रस्त व मतीमंर निवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान हे 1650/- रुपये वरुन 2450/- रुपये इतके करण्यात करण्यास सदर मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आलेली आहे .

राज्यातील आदिवास सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवठा करणेबाबत : राज्यातील आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करुन देणेबाबत , मंजुरी देण्यात आलेली आहे .

नांदेड येथिल गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग-भांडवल करण्यास मंजूरी : राज्यातील नांदेड येथे स्थित गुरुजी रुग्णालयात विशेष बाब म्हणून शासकीय भाग भांडवल उपलब्ध करुन देण्यास आज रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे ..

राज्यातील कारागृहांमध्ये अद्ययावत सुधारणांसाठी अध्यादेश : राज्यातील कारागृह व सुधार सेवेकरीता अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . यांमध्ये केंद्र शासनांकडून कारागृहातील बंद्यांमध्ये सुधारणा व पुनर्वसनाचा विचार करुन मॉडेल प्रिझन्स कायदा 2023 तयार केला आहे .

नव तेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प : नव तेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प हे पुढील 7 वर्षाकरीता राबविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे . यापुर्वी 6 वर्षाकरीता राबविण्याचे नियोजित होते .

  • तसेच राज्यातील जुन्या जलविद्युत प्रकल्पांचे आधुनिकीकरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे ..
  • तसेच पुर्णामाय सहकारी सुतगिरणीला अर्थसहाय्यक करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
  • तसेच ठाणे महानगर पालिकेच्या विविध उपक्रमांसाठी शसकीय जमीन कन्व्हेंशन सेंटर , पक्षी गृह उभारण्यास मंजूर देण्यात आलेली आहे .
  • राज्य शासन सेवेतील सहकारी संस्थांना राज्य शासनांकडून अर्थसहाय्य देण्यास मंजूरी ..
  • तसेच राज्यातील आदिम जमाती मधील कुटुंबाना हक्काचे घर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत , आदिम जमातीमध्ये कोलाम , कातकरी , माडिया , गोंउ या जातींचा समावेश होतो ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed