Live Mararhipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Government Cabinet Meeting Dated 10 January 2024 ] : राज्य शासनांची दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी कॅबिनेट बैठक संपन्न झाली आहे , सदर बैठकीमध्ये राज्य शासनाने कर्मचारी तसेच शेतकरी / नागरिकांच्या हिताचे अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत .
कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागु : विरार जिल्हा पालघर येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामधील दिनांक 01.11.2005 पुर्वी रुजु झालेल्या त्याचबरोबर दिनांक 12.07.2007 च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने ताब्यात घेतलेल्या पुर्नवसन केंद्रामधील 23 कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) लागु करण्यास दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे . सदर पुनर्वसन केंद्रामधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु झाल्याच्या नंतर त्यांच्या सीपीएफ जमा रक्कम ही त्यांना व्याजासह अदा करण्यात येईल .
आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी आभासी वैयक्तिक ठेव लेखा व्यवस्था व कार्यपद्धती : राज्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना त्याचबरोबर अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांना सहायक अनुदानाच्या निधींचे संवितरण करण्याकरीता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागु करण्यास मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे . सदर कार्यपद्धती व प्रक्रिया निश्चित करणेबाबतची प्रत्यक्ष अंमलबजावणी राज्य शासनांच्या वित्त विभागाच्या स्तरावरुन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
न्यायिक अधिकाऱ्यांची पदे भरण्यास मान्यता : राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त 2 हजार 863 त्याचबरोबर सहाय्यभुत 11,064 पदे निर्माण करण्यास व 5,803 मनुष्यबळ बाह्य यंत्रणा द्वारे उपलब्ध करुन घेण्यास तसेच सदर मंजूर पदांवरील भरती ही टप्याटप्याने करण्यास सदर मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे .
मंत्रीमंडळ बैठकीतील इतर निर्णय : राज्यातील नागरी भागांमध्ये आता बाल विकास केंद्राची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आलेली आहेत . याकरीता 11.52 कोटी रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे . त्याचबरोबर पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना , कोथेरी लघुपाटबंधारे प्रकल्प बाधितांना आर्थिक पॅकेज मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . आता यापुढे प्रधानमंत्री ( ग्रामीण भागाकरीता ) आवास योजना निकष याप्रमाणे बांधण्यात आलेल्या घराऐवजी 1 लाख 65 हजार रुपये निर्वाह भत्ता म्हणून अदा करण्यास सदर निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे .
पशुधन असणाऱ्यांना / छोट्या दुकानदारांना आता मिळणार 25,000 / 50,000/- रुपयांची मदत : गोठा अथवा छोटे दुकान असणाऱ्यांना 25,000/- रुपये तर कारागीर / छोटे व्यापारी असणाऱ्यांना ऐकवेळेचे 50,000/- रुपये इतके अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .त्याचबरोबर आता घर बदलल्यानंतर एकवेळेचे पुनर्स्थापना भत्ता म्हणून रुपये 50,000/- देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर सत्यशोधक या मराठी चित्रपटास राज्य वस्तु व सेवा कर ( SGST ) मधून सुट देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . तसेच पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना मधून भूमिहितांना 100,000/- रुपयांचे अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहेत . श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याास मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.