Braking News : देशात दि.11 मार्च 2024 पासुन CAA ( नागरिक दुरुस्ती विधेयक) कायदा लागु ; जाणून घ्या सविस्तर कायद्यातील तरतुदी !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Centre Nofifies Citizenship Act ] : देशांमध्ये नविन नागरिक दुरुस्ती विधेयक कायदा लागु करण्यात आलेला आहे , सदर कायद्या अंतर्गत नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत , या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

देशांमध्ये नागरिक दुरुस्ती विधेयक 1955 मध्ये बदल करणेबाबत विधेयक सन 2016 मध्ये पारित करण्यात आलेला होता , दिनांक 10 डिसेंबर 2019 मध्ये लोकसभेत आणि दिनांक 11 डिसेंबर 2019 रोजी राज्यसभेत पास करण्यात आला , त्यानंतर लगेचच दिनांक 12 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रपती यांची मंजूरी मिळाली . सदर कायद्यास दिनांक 11 मार्च 2024 रोजी केंद्र सरकारकडून CAA अधिसूचना जारी करण्यात आली आहे .

सदर कायद्याचा मुख्य उद्देश : सदर कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे पाकिस्थान , अफगाणिस्थान तसेच बांगला देश मधून भारतात आलेल्या हिन्दु , जैन , बौद्ध , ख्रिश्चन , शिख आणि पारशी या सहा समुदायांच्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याचा आहे . सदर कायद्यानुसार सदर निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे .

सदर वरील सहा समुदायांच्या भारतातील 12 वर्षे वास्तव्या ऐवजी 06 वर्षे वास्तव्या नंतर आणि त्यांच्याकडे उचित कागद पत्रे नसली तरी त्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात येते . या कायद्यामुळे वरील सहा बिगर मुस्लिम निर्वासितांना भारताची नागरिकत्व मिळणार आहे .

या कायद्यातील काही महत्वपुर्ण बाबी : या कायद्यानुसार अफगाणिस्थान , पाकिस्थान , बांगलादेश या देशातुन धार्मिक छळामुळे भारतात शरण घेतलेल्या वरील सहा समुदायानां भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहेत , वरील 03 देशातीलच नागरीक नागरिकत्व करीता आवेदन सादर करु शकणार आहेत . सदर कायद्याचा भारतीय नागरीक यांच्याशी कोणताही संबंध नाही .

Leave a Comment