Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ bjp second list publish ] : भारतीय जनता पार्टी कडून पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांना संधी देण्यात आली होती , आता दुसऱ्या यादीमध्ये 22 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. असे मिळून भारतीय जनता पार्टी कडून एकूण 121 जागेवर उमेदवारी देण्यात आली आहे .
दुसरी यादीमध्ये , देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या संबंधातील उमेदवारांचा समावेश आहे . गोपीचंद पडळकर , रमेश कराड यासारख्या विधान परिषद सदस्यांचा देखील या दुसऱ्या यादीमध्ये समावेश आहे . याबाबतची सविस्तर यादी खालील प्रमाणे जाणून घेवूया ..
- राम भदाणे – धुळे ग्रामीण
- चैनसुख संचेती – मलकापूर
- प्रकाश भारसाकळे – अकोट
- विजय अग्रवाल – अकोला पश्चिम
- श्याम खोडे – वाशिम
- केवलराम काळे – मेळघाट
- मिलिंद नरोटे – गडचिरोली
- देवराम पोंगले – राजुरा
- कृष्णालाल सहारे – ब्रह्मपुरी
- करण देवतले – वरोरा
- देवयानी फरांदे – नाशिक मध्य
- हरिश्चंद्र भोये – विक्रमगड
- कुमार आयलानी – उल्हासनगर
- रवींद्र पाटील – पेन
- भीमराव तपकीर – खडकवासला
- सुनील कांबळे – पुणे छावणी
- हेमंत रासने – कसबा पेठ
- रमेश कराड – लातूर ग्रामीण
- देवेंद्र कोठे – सोलापूर शहर मध्य
- समाधान आवताडे – पंढरपूर
- सत्यजित देशमुख – शिराळा
- गोपीचंद पडळकर – जत