Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Biometric attendance of teachers/employees is mandatory, otherwise salary withholding order ] : राज्यांमधील ज्या शाळा ह्या अनुदानास पात्र असतील , अशा शाळेतील विद्यार्थी , शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची हजेरी ही बायोमॅट्रिक पद्धतीने चेहरा ओळख प्रणाली द्वारे नोंदविण्याचे बंधनकारक करण्यात आले आहेत .
ज्या शाळांची उपस्थिती ही बायोमॅट्रिक पद्धतीने घेतली जाणार नाही , अशा शाळांवरील शिक्षक / कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचे आदेश शिक्षण विभागांकडून देण्यात आलेले आहेत . सदरचे आदेश हे राज्य शासनांच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 14.10.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत .
सदर निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व अंशत : अनुदानित , पुर्णत : अनुदानित शाळांनी बायोमॅट्रिक हजेरी घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . तर पगार देयक सादर करताना यापुढे बायोमॅट्रिक उपस्थिती रिपोर्ट सादर करावा लागणार आहे .
बायोमॅट्रिक ओळख प्रणाली ही चेहरा ओळखून हजेरी लावते , जी हजेरी रेकॉर्ड सदर मशिन ॲक्सेस असणाऱ्यांकडे तात्काळ जमा होते .शाळेतील गैरप्रकार कमी व्हावा याकरीता या प्रकारच्या बायोमॅट्रिक हजेरीचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.