Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Big important update for white ration card employees ] : शुभ्र शिधा पत्रिका असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे शुभ्र शिधापत्रिका असणाऱ्यांनी सदर शिधापत्रिका आधार कार्ड सोबत संलग्न करणे संदर्भात अन्न , नागरी , पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून दिनांक 18 जून 2024 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे ..
सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की , सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार , महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून , राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून …
सदर शासन निर्णयानुसार निर्धारित केलेल्या घटकांमध्ये दिनांक 28 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार सुधारणा करण्यात आलेली आहे .त्यानुसार लाभार्थी घटकांमध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे .
शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबीयांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनाचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे . याकरिता शुभ्र शिधापत्रिका धारक क्रमांकाची सलग्न करण्याची कार्यवाही करण्यात यावी , अशी विनंती करण्यात आली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.