23 जानेवारी नंतर मोबाईल रिचार्ज मध्ये मोठा बदलाव ; ग्राहकांना डाटा रिचार्जची  आवश्यक नाही !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Big change in mobile recharge after January 23 ] : ट्राय मार्फत देशात नविन रिचार्ज प्रणाली अस्तित्वात आणण्यात येणार आहे , ज्यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे . यामध्ये यापुढे ग्राहकांना विनाकारण डाटा रिचार्ज करायची आवश्यक राहणार नाही .

सध्या ग्राहकांना सिमकार्डची सेवा सुरु ठेवण्यासाठी एक अनलिमिटेड रिचार्ज करावे लागते , जे कि ग्राहकांना आवश्यक राहतच नाही . केवळ सिमकार्डची सेवा सुरु ठेवण्यासाठी असे रिचार्ज कंपनीकडून घेतले जाते . ज्यामुळे ग्राहकांना विनाकारण डाटा प्लॅनसह रिचार्ज करावा लागतो .

जे ग्राहक दोन सिमचा वापर करतात , व त्यांना केवळ सिमची सेवा सुरु ठेवण्यासाठी रिचार्ज करायला आहे , अशांना आता दि.23 जानेवारी नंतर केवळ अनलिमिटेड प्लॅन डाटा पॅक शिवाय उपलब्ध करुन द्यावा लागणार आहे .

ज्यामुळे सदर अनलिमिटेड प्लॅन केवळ कॉलिंग करीता उपलब्ध करुन दिली जाणार आहे , परिणामी केवळ सिमची सुविधा सुरु ठेवण्यासाठी अनलिमिटेड रिचार्ज कमी पैशात उपलब्ध होणार आहे .

ही सुविधा आगामी नविन वर्षात दि.23 जानेवारी नंतर करण्याचे निर्देश सर्व टेलिकॉम कंपन्यांना देण्यात आले असल्याची ट्रायकडून माहिती उपलब्ध झाली आहे . यामुळे अनेक ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे .

Leave a Comment