Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Bharatiy Janata Party Loksabha Jahirnama List ] : भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा जाहीरनामा जाहीर करण्यात आलेला असून , सदर जाहीरनाम्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा जाहीर करण्यात आलेले आहेत . याबाबत सविस्तर जाहीरनामाच्या यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
भारतीय जनता पक्षाची सत्ता 2014 पासून आल्यानंतर शेतकऱ्यांकरीता विविध नविन योजना राबविण्यात आलेल्या आहेत . आता यांमध्ये आणखीण वाढ तसेच सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे , याकरीता भारतीय जनता पार्टीने आपल्या जाहीरनाम्यांमध्ये शेतकऱ्यांकरीता आगामी काळात सत्ता स्थापन झाल्यानंतर शेतीविषयक विविध योजना / आगामी धोरण जाहीर करण्यात आलेले आहेत .
2024 मधील सत्ता स्थापनेनंतर शेतकऱ्यांना सरकारी खरेदीला अधिकाधिक प्रोत्साहन दिले जाणार आहेत .तसेच सध्या देशातील शेतकऱ्यांकरीता राबविण्यात येणारी पी.एम शेतकरी सन्मान निधी योजना आणखीण सशक्त करण्यात बनविले जाणार आहेत . विविध पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये भरघोस वाढ केली जाणार आहे .
- देशातील शेतकरी बांधवांना जागतिक स्तरावर सर्वात स्वस्त खते तसेच बियाणे उपलब्ध करुन दिले जाईल .
- शेतीमालाला योग्य दर मिळविण्याकरीता त्यांच्या शेतीमालाला साठवणूकीसाठी विशेष महत्व दिले जाईल .
- देशात राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री कृषी संचिन योजना अंतर्गत देशभरात सिंचन क्षमता वाढविली जाणार आहे .
- शेतकऱ्यांच्या पशुधन दुधास योग्य भाव व मागणी वाढावी याकरीता दुध डेअरी व सहकारी संघांच्या संख्यामध्ये वाढ केली जाईल .
- देशातील गरीब कुटुंबातील लोकांना रुपये 5 लाख पर्यंत निशुल्क आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन दिले जाईल .
- वय वर्षे 70 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना आयुष्यमान योजना अंतर्गत विविध लाभ मिळवून दिले जाणार आहे .
- केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी मोफत रेशन कार्ड योजना आणखीण 5 वर्षे सुरु राहणार आहे .
- कृषी क्षेत्रांवर विशेष लक्ष दिले जाणार असून , देशांमध्ये अन्न प्रक्रिया हब बनविण्यात येईल .
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लाभ यापुढे 10 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळत राहील .
अशा प्रकारच्या बाबी भारतीय जनता पार्टीने आपल्या जाहीरनाम्यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .