Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ India – Maladiv Relation Update News ] : सध्या भारत व मालदीव विवाद चांगला पेटला आहे , पण यामागचा नेमका कोणता प्रकरण आहे ते सविस्तर या लेखांमध्ये जाणून घेवूयात ..
भारताचे पंतप्रधान नुकतेच लक्षद्विपच्या दौऱ्यावर गेले होते , यावेळी पंतप्रधानांने लक्षद्विप हे पर्यटनांसाठी उत्तम असल्याचे सांगितले . यामुळे मालदीवला असे वाटले कि , पंतप्रधान भारतातुन मालदीवला येणाऱ्या पर्यटकांसाठी लक्षद्विव हे पर्याय शोधत आहेत . कारण मालदीव या देशांमध्ये सर्वात जास्त भारतीय पर्यटन जातात , ज्यामुळे मालदिवला मोठ्या प्रमाणात भारतीय चलन प्राप्त होते . एका रिपोर्टनुसार मालदीवला एकुण बजेटच्या 28 टक्के महसुल हे भारतीय पर्यटकांकडून मिळते . या प्रकरणांमुळे मालदिव्याच्या मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान यांच्याविरुद्ध अपमानास्पद व्यक्तव्य करण्यात आले .
त्याचबरोबर मालदिव हे मुस्लिम राष्ट्र आहे , यामुळे सध्या जागतिक स्तरावर चाललेले इस्त्राईल – हमास युद्धांमध्ये भारताने इस्त्राईलचे साथ दिल्याने मुस्लिम राष्ट्र मालदिवच्या तीन मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “कठपुतली” असे संबोधले यामुळे विवाद अधिकच पेटला आहे . या प्रकरणांमुळे सदर तीन मंत्र्यांचा मालदीव सरकारने राजीनामा घेतला आहे .
तर भारत सरकारकडून बायकॉट मालदीव मोहिम सोशल मिडीयावर चालत आहे , तर अनेक पर्यटकांनी मालदीव पर्यटनांची बुकिंग रद्द केल्या आहेत . यामुळे मालदीवला मोठा आर्थिक फटका बसणार आहे . या प्रकरणांवर मालदीव सरकारकडून पुर्णत : नरमाईची भुमिका घेण्यात येत आहे .
त्याचबरोबर मालदीव पर्यटन विभागांकडून माफीनामा जाहीर करण्यात आलेला आहे , यांमध्ये सांगण्यात आले आहे कि , मालदवी पर्यटनांमध्ये भारताचा मोठा हिस्सा असून , भारत हा एक मालदीवचा समुद्र तट सांझा करणारा देश असून भारताने मालदीव आतापर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक व सामाजिक मदत केली आहे . सदर मंत्र्यांनी केलेली टिप्पणी ही त्यांची वैयक्तिक टिप्पणी असून मालदीव सरकारची टिप्पणी नाही असे नमुद करण्यात आलेले आहेत .