लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : देशांमध्ये सध्या राष्ट्रीय पेन्शन योजना व खाजगीकरण विरोधात देशातील कर्मचाऱ्यांकडून NPS / खाजगीकरण भारत छोडो यात्रा काढण्यात येत आहे .ही यात्रा दि.23 जून रोजी महाराष्ट्रात धडकणार आहे , या यात्रेस राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात येणार आहेत . त्याचबरोबर या यात्रेस सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा देखिल पाठिंबा मिळत आहे .
राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी या प्रमुख मागणीकरीता देशातील सर्व कर्मचारी एकत्र येवून सरकार विरुद्ध लढा देत आहेत .भारत छोडो यात्रा देशांमध्ये सर्व राज्यात जावून जुनी पेन्शन योजनाचे महत्व तसेच राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचे होणारे नुकसान बाबत संबोधित करुन सरकार विरूद्ध लढा देत आहेत .
तसेच आगामी लोकसभा / विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर कर्मचाऱ्यांकडून आपल्या मागण्या सरकारकडून पुर्ण करुन घेण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे . ही यात्रा बिहार मधील चंपारण्य येथून दि.01 जुन 2023 पासून सुरुवात झाली आहे .ही यात्रा राज्यात दि.23 जूनला धडकणार असून या यात्रेची जंगी स्वागत करण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांकडून मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात येणार आहेत .ही यात्रा राज्यातील सहाही विभागांमध्ये जाणार आहे .
हे पण वाचा : आनंदाची बातमी : पेन्शनधारकांना मिळणार वाढीव पेन्शन , सरकारने घेतला मोठा निर्णय !
या यात्रेमुळे राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांना अधिकच बळ मिळणार आहे , ही भारत छोडो यात्रा दि.23 जुन रोजी महाराष्ट्रात येणार असून या यात्रेंमध्ये लाखोंच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे , असे आव्हाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्यसंघटक संजय सोनार कळवाडीकर यांनी केले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !