Live Marathipepar बालाजी पवार प्रतिनिधी [ Indian Post Office Best 5 Investment Schemes For Women ] : भारतीय टपाल विभाग हे केंद्र सरकारच्या अधिनस्थ येत असल्याने भारतीय टपाल मध्ये करण्यात आलेली गुंतवणुक ही सर्वाधिक सुरक्षित मानली जाते . टपाल विभागांमध्ये इतर बँका / वित्तीय संस्था ( सरकारी अधिनस्थ ) पेक्षा सर्वाधिक परतावा दिला जातो . यामुळे गुंतवणुकदारांची पहिली पसंत भारतीय टपाल हे आहे . शिवाय महिलांच्या नावाने गुंतवणुक केल्यास , सर्वाधिक परतावा देण्यात येणारे 5 सर्वोत्तर योजना पुढीलप्रमाणे पाहुयात .
सुकन्या समृद्धी योजना ( Sukanya Samrudhi Yojana ) : या योजनेमध्ये फक्त मुलींच्या नावानेच गुंतवणुक करता येते . मुलीच्या जन्मानंतर वयाच्या 10 वर्षापर्यंत सुकन्या समृद्धी योजनाचे खाते उघडू शकता . ही केंद्र सरकारची योजना सर्वात लोकप्रिय योजना असुन , या योजनेंमध्ये आपण मासिक / त्रैमासिक / वार्षिक स्वरुपात गुंतवणुक करु शकता . या योजनाच्या ठेवीवर सर्वाधिक 8 टक्के व्याजदर आहे .
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ( National Saving Certificate ) : राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हे महिलांसाठी गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे . या योजनांतर्गत किमान 1,000/- रुपये पासून ते कमाल गुंतवणुकीवर मर्यादा नाही . या बचत योजनांमधील गुंतवणूकीवर 7.7 टक्के दराने व्याज मिळतो . यामध्ये मिळणाऱ्या वार्षिक परताव्याच्या 150,000/- पर्यंतचे उत्पनावरच करसवलत मिळते .
महिला सन्मान बचत योजना : महिला सन्मान बचत योजना मोदी सरकारने मागील वर्षीपासून सुरुवात केली आहे . या योजनेमध्ये खास महिलांसाठी कमाल 2 लाख रुपये पर्यंत गुंतवणुक करता येईल . ज्यावर 7.5 टक्के इतका परतावा मिळेल , तर या योजनेचा एकुण कालावधी हा दोन वर्षांचा असेल , त्यानंतर परत दोन वर्षांसाठी वाढवता येईल .
मुदत ठेव योजना ( FD ) : टपाल खात्यांमध्ये मुदत ठेव हा देखिल महिलांसाठी उत्तम गुंतवणूकीचा पर्याय आहे . आपण जर भारतीय टपाल विभागांमध्ये 5 वर्षांकरीता गुंतवणुक केल्यास , 7.5 टक्के इतका व्याजदर प्राप्त होईल . जे कि , इतर सार्वजनिक बँकापेक्षा अधिक आहे .
PPF ( पीपीएफ ) गुंतवणुक योजना : महिलांच्या नावाने दिर्घ कालावधीसाठी गुंतवणुक करुन उतारवयांमध्ये आर्थिक लाभ घेवू इच्छत असल्यास , सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना ( PPF ) ही गुंतवणुक योजना सर्वोत्तम आहे . या योजनांच्या ठेवीवर 7.1 टक्के इतका व्याजदर मिळतो .