Spread the love

Live marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [The Secret Weapon of Wealth Creation] : दिवसेंदिवस महागाई मध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अशावेळी कित्येक व्यक्तींना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आजकाल लोक त्यांच्या पुढील भविष्यामधील गरजा पूर्ण करण्यासाठी जसे की लग्न, तसेच मुलांचे भवितव्य, यासोबतच सेवानिवृत्ती अशी विविध हिताची कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजनावर सक्रियपणे भर देत आहेत.

तुम्हाला जर तुमच्या मुलाचे शिक्षण, तसेच लग्नाच्या खर्च, सोबत इतर कोणत्याही काळजी शिवाय त्यांचे भविष्य अगदी सुरक्षित करायचे असेल तर तज्ञ लोकांनी असा सल्ला दिला आहे की त्यांच्या जन्म झाल्यापासूनच त्यांचे आर्थिक नियोजन करणे सुरू करा (sip investment in marathi). प्रत्येक महिन्याला त्याच मुलाच्या नावावर पाच हजार रुपयांची गुंतवणूक करा. ही गुंतवणूक सातत्याने वीस वर्षापर्यंत केली तर 50 लाख रुपयांची रक्कम अगदी सहजपणे तुम्हाला मिळू शकेल. हे आता कसे साधे करता येणार आहे. त्याविषयी चला सविस्तरपणे माहिती घेऊया.

एसआयपीनं बनेल पैसा : आज काल बघितले तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एस आय पी अशा पर्यायांना नागरिक प्राधान्य देत आहेत. कारण की अशा योजना सुद्धा खूपच लोकप्रिय झाल्या आहेत (sip plans). तरीही आपण हेच लक्षात घेतली पाहिजे की, बाजाराशी संबंधित या गोष्टी असल्यामुळे आपण याला निश्चित व्याजदराची हमी अजिबात देऊ शकत नाही..

तरीसुद्धा थेट बाजारांमधील गुंतवणुकीच्या तुलनेमध्ये म्युच्युअल फंड हा अगदी कमी जोखीमी चा पर्याय मानला जात आहे. चक्रवाढ व्याजाच्या याच फायद्यामुळे एसआयपी अगदी दीर्घ कालावधीसाठी संपत्ती जमा करण्याकरिता अगदी प्रभावीपणे योगदान देण्याचे काम करत आहे. असे तज्ञांनी सांगितले. सर्वसाधारणपणे 12% पर्यंत परतावा यामध्ये मधून आपल्याला मिळू शकतो.

कस आहे गणित? : याचे एक उदाहरण बघायचे असेल तर, समजा तुमच्या घरी नवजात बाळाचा जन्म झाला असेल तर अशावेळी त्याच्या जन्मानंतर प्रति महिना पाच हजार रुपयांचे रक्कम एस आय पी मध्ये गुंतवली तर अशावेळी वीस वर्षांपर्यंत तुम्ही सातत्याने अशीच गुंतवणूक ठेवली तर पुढील 20 वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक 12 लाख रुपयांची होणार आहे (sip interest rate ). त्याच गुंतवणुकीवर तुम्हाला 38 हजार रुपयांचे व्याजदर मिळेल. अशावेळी प्राथमिक गुंतवणूक तसेच पुढील व्याजदर एकत्र केले तर वीस वर्षांमध्ये तुम्हाला 50 लाख अगदी बिनधास्तपणे भेटतील.

जर तुमची जी काही गुंतवणूक असेल ती आणखी पाच वर्षे म्हणजे एकूण 25 वर्षासाठी वाढवायची ठरवली तर तुम्हाला या माध्यमातून 94 लाख रुपये इतकी रक्कम मिळेल आणि ही अशी रक्कम आहे जी कोणत्याही योजनेच्या माध्यमातून मिळू शकणार नाही. तुम्हाला जर अंदाजे बघितले तर 15% पर्यंत परतावा तुम्ही मिळवला तर यामध्ये नफ्याची शक्यता अधिक असणार आहे. ही एकूण मिळालेली रक्कम तुम्ही तुमच्या पुढील भवितव्यासाठी किंवा तुमच्या मुलाच्या भवितव्यासाठी अगदी बिनधास्तपणे वापरू शकता.

कृपया ही माहिती लक्षात घ्या की, आम्ही जी माहिती दिली आहे ती एक सामान्य स्वरूपाची माहिती आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला मानू नये. गुंतवणूक करण्याचा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर ज्या त्या क्षेत्रामधील व्यावसायिक तसेच तज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

एसआयपी साठी तुम्ही कोणते ॲप वापरू शकता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही groww , Coin by Zerodha , Paytm Money Mutual Funds App , इत्यादी विविध ॲप्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ते तुम्ही अगदी बिनधास्तपणे वापरू शकता. यामधील groww ॲप सर्वाधिक सुरक्षित असून विश्वासू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *