Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Best Investment Option ] : आपल्याला जर भविष्यांमध्ये चांगल्या रिटर्नचा फायदा घ्यायचा असेल , खाली नमुद योजनांमध्ये पैशांची गुंतवणुक केल्यास , निश्चित आपणांस चांगला आर्थिक फायदा होणार आहे . याकरीता सर्वोत्तम 5 लाभदायक पर्याय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ( SCSS ) : ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असून , भारतीय पोस्टामध्ये या योजनांचा लाभ घेवू शकता . या योजना अंतर्गत आपणांस गुंवणुकीवर 8.20 टक्के इतका व्याजदर मिळतो . या मध्ये आपण किमान 1000/- रुपये ते कमाल 30 लाख रुपये पर्यंत रक्कम जमा करु शकता .. सदरची योजना 5 वर्षाकरीता असुन , गुंतवणुकीनंतर प्रतिमहा पद्धतीने व्याजाची रक्कम मिळते . या योजना अंतर्गत 1.5 लाख रुपये पर्यंतच्या उपन्नाच्या रक्कमेवर आयकर सुट दिले जाते .
पोस्ट ऑफीस मासिक उत्पन्न योजना ( Post Office Monthly Income Scheme ] : या योजना अंतर्गत आपणांस 5 वर्षांच्या गुवणुकीवर 7.4 टक्के इतका व्याजदर मिळतो , यांमध्ये वैयक्तिक गुंतवणुकदार कमाल 9 लाख रुपये तर जोडप्याकरीता 15 लाख रुपये इतकी कमाल रक्कम गुंतवणुक करता येते . यांमध्ये कमाल रक्कम 9 लाख रुपये गुंतवणुक केल्यास वैयक्तिक गुंतवणुकदाराला 5,550/- रुपये तर जोडप्याने कमाल 15 लाख रुपये गुंतवणुक केल्यास 9,250/- रुपये इतकी रक्कम मासिक पेन्शन स्वरुपात मिळते ..
अटल पेन्शन योजना ( Atal Pension Scheme ] : ही पेन्शन योजना खास करुन गरिब / मध्यम वर्गीय नागरिकांसाठी बनविण्यात आलेली आहे . या योजना अंतर्गत 18 ते 40 वयोगटातील नागरिक ओवदन सादर करु शकता . जेवढी रक्कम गुंतवणूक दार यांमध्ये गुंतवणूक करेल तेवढी रक्कम केंद्र सरकारकडून सदर खात्यांमध्ये गुंतवणुक केली जाते , व वयाच्या 60 वर्षाच्या नंतर सदर लाभार्थ्यांस 1 ते 5 हजार रुपये मासिक पेन्शन दिले जाते .
महिलांसाठी खास गुंतवणुक योजना : केंद्र सरकारकडून महिलांसाठी खास गुंतवणुक योजना म्हणून महिला सन्मान बचत योजना तयार करण्यात आलेली आहे , सदर योजना अंतर्गत 7.5 टक्के इतका व्याजदर मिळतो , तर या योजना अंतर्गत किमान 1000/- रुपये तर कमाल 2,00,000/- रुपये इतकी रक्कम गुंतवणुक करता येते .व अवधी 02 वर्षांचा आहे .
भविष्य निर्वाह निधी ( Public Provident Fund ] : भविष्य निर्वाह निधी योजना अंतर्गत 15 वर्षाच्या अवधीकरीता एका वित्तीय वर्षांमध्ये 150,000/- रुपये इतक्या कमाल मर्यादेपर्यंत गुंतवणुक करता येते 15 वर्षाच्या अवधीनंतर एकरकमी रक्कम दिली जाते , या योजना अंतर्गत व्याजदर 7.1 टक्के इतका आहे . यांमध्ये आपण प्रतिमहा पद्धतीने गुंतवणुक करावी लागेल .यांमध्ये आपण जर प्रतिमहा 12500/- रुपये गुंतवणुक केल्यास , आपणांस 15 वर्षाच्या अवधीनंतर एकुण 39,44,600/- रुपये इतकी रक्कम मिळेल .