Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ bank 05 days working days & 02 days leave ] : बँकिंग कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 02 दिवसाची सुट्टी तर कामकाजाचे 05 दिवस याबाबत बऱ्याच दिवसापासून , कर्मचाऱ्यांकडून मागणी होत आहे . परंतु बँकिंग कामकाजाचे दिवस 05 दिवस झाल्यास इतर दिवसांचे बँकिंग कामकाज वेळामध्ये बदल होणार आहे .

बऱ्याच दिवसापासून बँकिंग कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आठवड्यातून दोन दिवस सुट्टीची मागणी करीत आहेत . म्हणजेच इतर सरकारी कार्यालयाप्रमाणे शनिवारी आणि रविवारी सुट्टी देण्यात यावी , अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे . या मागणी संदर्भात इंडियन बँक कॉम्फेडरेशन (IBA) व बँक कर्मचारी संघटनांमध्ये एकमत झाल्याने , सदर मागणी सरकारकडून मान्य होऊ शकते .

म्हणजेच इंडियन बँक कॉम्फेडरेशन (IBA) व बँक कर्मचारी यांच्यामध्ये 05 दिवसांचा आठवडा करणे संदर्भात एकमत झाले आहे . यासंदर्भात माहे डिसेंबर पर्यंत सदर निर्णयाला केंद्र सरकारकडून मंजुरी दिली जाईल . सदर नियमानुसार देशातील खाजगी त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील बँका ह्या आठवड्यातून दोन दिवस सुट्टीच्या नियमा खाली येणार आहेत .

सदर नियम लागू झाल्यानंतर बँकिंग वेळामध्ये देखील बदल होईल , सध्या बँका ह्या सकाळी दहा वाजता उघडतात . तर सायंकाळी पाच वाजता बंद होतात , सदर नवीन नियम लागू झाल्याच्या नंतर बँका सकाळी 9:45 ते सायंकाळी 5:30 मिनिटे पर्यंत कामकाज सुरू राहील .

सद्यस्थितीमध्ये देशातील बँका दुसरा आणि चौथा शनिवारी बंद राहते , परंतु सदर पाच दिवसांच्या आठवड्यामुळे बँकांना देखील दर शनिवार , रविवारी सुट्टी राहील . सदर पाच दिवसाच्या आठवड्यामुळे बँकिंग वेळामध्ये वाढ होणार असल्याने , ग्राहकांना देखील फायदा होणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *