Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ bangaladeshi enter in india news ] : बांग्लादेश मध्ये सध्या सत्ता लष्करांच्या हातामध्ये गेली आहे , यामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा देवून देशातुन पलायन केलेल्या शेख हसीना यांच्या समर्थकांना बांग्लादेशांमध्ये लष्कर , विद्यार्थी मार्फत त्रास देण्यास सुरुवात झाली आहे .

आज रोजी मोहम्मद युनुस या नोबेल पारितोषिक विजेते यांच्या नेतृत्वामध्ये बांग्लादेशात अंतरिम सत्ता स्थापन केली जाणार आहे , परंतु तुर्तास बांग्लादेशांमध्ये हिंसक आंदोलने सुरु आहेत , शेख हसीना यांच्या पक्षांच्या नेत्यांचे घरे जाळून टाकरण्यात येत आहेत . तसेच काही विशिष्ट समुदायावर जमावांकडून त्रास होत असल्याने , भारताच्या हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत .

काल रोजी हजारे बांग्लादेशी नागरिक पश्चिम बंगालच्या सीमेवरुन भारतांध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला , यास  भारतीय सुरक्षा दलांकडून रोखण्यास यश मिळाले तर , बीएसएफ मार्फत आणखीण सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे . यामुळे सदर भारत – बांगलादेश सीमावर्ती भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत .

पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळांमध्ये बांगलादेशातील बऱ्याच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे , परंतु आता सत्तांतरणानंतर पुन्हा एकदा बांगलादेश दहशतवाद्यांचे केंद्र स्थान बनु शकतो अशी चिंता हिमंता बिस्वा सरमा ( आसाम – मुख्यमंत्री ) यांच्या कडून व्यक्त करण्यात आली आहे .

भारताला बांगलादेशाची 4096 किमी लांबीची सीमा लागुन आहे , यापैकी 2200 किमी सीमा एकटा पश्चिम बंगाल या राज्याला लागुन आहे , तर उर्वरित सीमा ही आसाम , मिझोराम , मेघालय , त्रिपुरा राज्याशी लागुन आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *