Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Bajarbhav Krushi News ] : शेतमालाची आवक कमी झाली असल्याने , सध्या मागील आठवड्यांपासून बाजारभावामध्ये मोठी तेजी दिसून येत आहे . यांमध्ये प्रामुख्याने डाळवगीर्य पिकांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत .

काल दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी राज्यात हरभराला सरासरी कमाल 5900/- रुपये इतका बाजारभाव मिळाला आहे , तर तुरीला राज्यात कमाल 10,800/- रुपये इतका सरासरी कमाल भाव मिळाल आहे . तर उडीदाला 8525/- रुपये इतका कमाल भाव मिळाला आहे . तर मसुरला सांगली येथे 7,225/- रुपये इतका कमाल बाजारभाव मिळाला .

अन्नधान्य पिकांचे कमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रअन्नधान्य पिकाचे नावकमाल बाजारभाव /बाजार समिती
01.गहु3360/- नागपुर
02.मका हायब्रिड2225/- अकोला
03.बाजरी2775/- सांगली
04.ज्वारी3500/- नंदुरबार
05.भात (जय श्रीराम )3165/- चार्मोशी

सोयाबीन बाजारभाव : सोयाबीनची आवक कमी होत असल्याने , दिवसेंदिवस बाजारभावांमध्ये वाढ दिसून येत आहे . काल दिनांक 17 एप्रिल रोजी धर्माबाद बाजारसमितीमध्ये राज्यातील सर्वाधिक 4565/- रुपये इतका बाजारभाव मिळाला , तर  त्यानंतर अमरावती बाजारसमितीमध्ये 4550/- रुपये इतका भाव मिळाला , त्यापाठोपाठ मोर्शी बाजारसमितीमध्ये 4460/- रुपये इतका बाजारभाव मिळाला .

म्हणजेच सोयाबाीनची आवक कमी होत असल्याने , बाजारभावांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे . पुढील महिन्यापर्यंत सोयाबीनला 5000/- रुपये पेक्षा अधिक बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *