Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state havaman andaj ] : राज्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट पसरली असून , हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार , दिनांक 07  मे ते 11 मे दरम्यानच्या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

आता भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या अंदाजानुसार दिनांक 06 मे ते 9 मे या कालावधीमध्ये राज्यात काही भागांमध्ये उष्णतेची प्रचंड लाट असणार आहे , तर राज्यातील काही भागांमध्ये पावसाची मोठी शक्यता वर्तवण्यात आली आहे . तर देशात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे , यामुळे पश्चिम बंगाल कडून येणाऱ्या चक्राकार वाऱ्याचा परिणाम म्हणुन मराठवाड्यात वारे सक्रिय होणार आहेत .

या वाऱ्याचा परिणाम म्हणून देशात ईशान्य भारतात तर , राज्यात मराठवाडा , खानदेश , विदर्भ या ठिकाणी दिनांक 09 मे पर्यन्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . तर पुढील 48 तासामध्ये राज्याचे तापमान आणखीन चार ते पाच अंशांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . यामुळे नागरिक तसेच शेतकऱ्यांनी शेत पिकांचे ,जनावरांची काळजी घेण्याचे निर्देश हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहेत .

राज्यातील “या”  जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी :  दिनांक 9 मे पर्यंत राज्यातील सिंधुदुर्ग , रत्नागिरी , रायगड, ठाणे या भागामध्ये उष्ण व आर्द्र हवामान असणार आहे , तर राज्यातील मराठवाडा भागातील नांदेड , लातूर त्याचबरोबर खानदेशातील सर्व जिल्हे तसेच विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेला आहे .

यावेळी वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किलोमीटर प्रतितास इतका असणार असून , तुरळक ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *