Live Marathipepar बालाजी पवार प्रतिनिधी : सध्या राज्यांमध्ये अवकाळी पावसांने थैमान घातले आहे , विदर्भ व मराठवाड्यांमध्ये अवकाळी पावसांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत . यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महसुल विभागांकडून पंचनामे करण्यात येत आहेत .
अवकाळी पावसांमुळे राज्यात ज्वारी , फळबागा यांमध्ये विशेषत : पपई , आंबा , केळी , डाळिंब या सारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत . यामुळे सदर शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक फायदा व्हावा , या उद्देशाने महसूल विभागांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी करण्यात येणार आहेत . याबाबत धाराशीव जिल्ह्यात उमरगा व लोहारा तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने मोठे थैमान घातले होते .
यामुळे सदर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनांकडून तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , यांमध्ये मृत / जखमी जनावरांचा देखिल समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . ज्या बागातदार शेतकऱ्यांचे आंबा , पपई , केळी आदी फळांचे नुकसान झाले आहेत , व ज्यांनी फळपिक विमा भरला आहे , अशांनी 72 तासांच्या आतमध्ये नुकसानीची तक्रार विमा कंपनीकडे दाखल करावी , असे निर्देश प्रशासनांकडून देण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर विदर्भांमध्ये अकोला , यवतमाळ , अमरावती , बुलढाणा , नागपुर , चंद्रपुर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतपीकांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत . अशा शेतकऱ्यांना मदत निधी अदा करण्यासाठी महसुल विभागांकडून पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . पंचनामे अंती प्रशासनांकडून आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत निधी जाहीर करण्यात येईल .
तसेच इतर जिल्ह्यातील शेतमाल , फळबागा यांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी जाहीर करण्याकरिता, तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून संबंधित महसूल विभागास देण्यात आली आहे .