लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : नविन वेतन आयोग : सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन अयोग लागु होणेबाबतच्या मिडीया रिपोर्टनुसार अनेक बातम्या समोर येत आहेत .लोकसभेमध्ये नविन वेतन आयोग बाबत प्रश्न उपस्थित केला असता , केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागु करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे . म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागु करण्यासाठी केंद्र स्तरावर लवकर वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येणार आहे .
नवा वेतन आयोग / ॲटोमेटिक पे कमिशन – मिडिया रिपोर्टनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , स्वयंचलित पद्धतीनुसार कर्मचाऱ्यांना पगारात वाढ करण्याची पद्धत सरकार अस्तित्वात आणण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे , व सरकारला याबाबत सल्ला देखिल देण्यात आला आहे .नवा वेतन आयोग ( आठवा वेतन आयोग ) लागु करण्यास लागणार विलंब व येणारा खर्च शिवाय महागाईचे स्थिरांक लक्षात घेता तज्ञांकडून ॲटोमेटिक पे कमीशनचा पर्याय सुचविण्यात आलेला आहे .
या ॲटोमेटिक पे कमीशन मध्ये सातव्या वेतन आयेगातीलच वेतनश्रेणींमध्ये महागाई भत्ता 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास स्वयंचलित पद्धतीने पगारात वाढ करण्यात येणार आहे .नविन वेतन आयोग लागु केल्यास , वेतनांमध्ये व इतर भत्यांमध्ये मोठी वाढ होवून सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणात बोजा निर्माण होईल , यामुळे केंद्र सरकार या पद्धतीचा अवलंब करण्याची शक्यता आहे .
या पद्धतीमध्ये स्वयंचलित पद्धतीनुसार वेतनात वाढ होईल , तर इतर लागु असणारे भत्तांचे दरांमध्ये बदल होईल . जसे महागाई भत्त्याचे दर शुन्य टक्के होईल . यामुळै सरकारच्या तिजोरीवर दिलासा मिळणार आहे . याबाबत केंद्र सरकारने अधिकृत्त वृत्त दिली नाही , परंतु मिडिया रिपोर्टमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग ( आठवा वेतन आयोग ) लागु न करता ॲटोमेटिक पे कमीशन द्वारे पगारवाढ देण्याची चर्चा सुरु आहे .
शासकीय कर्मचारी विषयक , नोकर पदभरती , तसेच चालु घडामोडींच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !