वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा मिळेल 5000/- रुपये पेन्शन ; जाणून घ्या “या” सरकारी योजनेबद्दल व लाभ घ्या !

Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ Atal pension scheme see detail info ] : सरकार नागरिकांना उतार वयामध्ये आर्थिक अडचण दूर करता यावी याकरिता एक विशेष लाभदायक योजना म्हणजेच अटल पेन्शन योजनाची सुरुवात केली आहे . या योजनेच्या माध्यमातून सरकार नागरिकांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा विशिष्ट रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते .

ही योजना खास करून गरीब नागरिकांकरिता सुरू केली गेली आहे . ज्यामुळे गरीब नागरिकांना 60 वर्षानंतर दरमहा पेन्शन देण्यात येते , यामध्ये किमान एक हजार रुपये ते पाच हजार रुपये इतकी पेन्शन दिली जाते . ज्यामध्ये वयानुसार आपले योगदान सदर पेन्शन योजनेमध्ये द्यावे लागते .

जेवढे योगदान नागरिक सदर योजनेमध्ये करतील तेवढेच योगदान सरकारी यामध्ये गुंतवणूक करते . सदर योगदानाची रक्कम अत्यल्प असल्याने , नागरिकांना सहज परवडणारी आहे . ज्यातून नागरिकांना वयाच्या साठ वर्षानंतर गुंतवणुकीच्या प्रमाणात एक हजार रुपये , दोन हजार रुपये , 3 हजार रूपये , 4 हजार रूपये , 5 हजार रुपये अशी रक्कम पेन्शन म्हणून दरमहा दिली जाईल .

एक हजार रुपये मासिक पेन्शन लाभ करिता वयानुसार किमान 42/- रुपये ते 291/- रुपये इतके मासिक योगदान द्यावे लागेल , तर दोन हजार रुपये पेन्शन प्राप्तीकरिता किमान 84/-  रुपये ते 582/- रुपये इतके योगदान द्यावे लागेल . तर मासिक 3000/- रुपये पेन्शन प्राप्ती करिता किमान 126/- रुपये ते 873/-  रुपये योगदान द्यावे लागेल .

तर मासिक 4000/-  रुपये पेन्शन प्राप्त करिता 168/-  रुपये ते 1164/-  रुपये मासिक योगदान द्यावे लागेल . तर पाच हजार रुपये पेन्शन प्राप्त करिता किमान 210/- रुपये ते 1454/-  योगदान द्यावे लागेल .

यामध्ये किमान वय 18 वर्षे ते 40 वर्ष दरम्यानचे नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात . म्हणजेच साठ वर्षापर्यंत सदर योजनेमध्ये गुंतवणूक करावी लागेल , त्यानंतर मासिक पेन्शन कर्मचाऱ्यांना लागू होईल . सदर योजना केंद्र सरकारने सुरू केल्याने , यामध्ये नागरिकांना 60 वर्षानंतर प्रत्यक्ष पेन्शनचा लाभ मिळतो ..

लाभ कसा घ्यावा : सदर पेन्शन योजने अंतर्गत लाभ घेण्याकरिता आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस , राष्ट्रीयकृत बँका , ग्रामीण बँका या ठिकाणी अर्ज करून सदर योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता .

Leave a Comment