Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Atal Bambu Samrudhi Yojana ] : शेतकऱ्यांना टिश्यु कल्चर बांबू रोपे पुरवठा व त्यांच्या देखभाल करीता अनुदान देण्यासाठी अटल बांबू समृद्ध योजना राबविणेबाबत , राज्य शासनांच्या महसूल व वन विभागांकडून दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या दिनांक 28.06.2019 रोजीच्या GR नुसार अटल बांबू समृद्धी योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवठा करण्याची तरतुद करण्यात आलेली होती , तथापि त्यांच्या देखभाल करण्यासाठी अनुदान देण्याची तरतुद सदर योजनांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नव्हती , यामुळे शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे लागवडीकरीता अनुदान देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर शासन निर्णय दिनांक 28.06.2019 नुसार शेतकऱ्याला एक हेक्टर करीता 600 रोपे देण्याची तरतुद आहे , त्याचबरोबर फक्त रोपांचे किंमत पैकी 80 टक्के अथवा 50 टक्के अनुदान लाभार्थ्यांचे भूधारणा मर्यादा नुसार देण्याची तरतुद आहे . रोप वनातील निंदणी , खत देणे , पाणी देणे , संरक्षण इत्यादी करीता तरतुद करण्यात आलेली नसल्याने सदरची तरतुद रद्द करुन त्याऐवजी 02 हेक्टर करीता 1200 रोपे लागवड व देखभालीकरीता अनुदान देण्याची तरतुद करण्यात येत आहेत .
सदर योजनेचे प्रमुख उद्दिष्ट्ये : सदर योजनेचे प्रमुख उद्दिष्ट्ये म्हणजे शेतकऱ्यांना बांबू लागवडीकरीता अनुदान देणे , तसेच शेतकऱ्यांना उत्पन्नाला जोड देणे , तसेच उद्योगास लागणारा कच्चा मालाचे उत्पादन करणे , शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणे इ.
निधींची तरतुद : सद योजना अंतर्गत शेतकऱ्यांकरीता तीन वर्ष करीता प्रति रोपे 350/- प्रमाणे खर्च ग्रहीत धरुन त्यापैकी 50 टक्के रक्कम अनुदान म्हणून तीन वर्षात देण्यात येते , त्याचबरोबर सदर अनुदानाची विभागणी ही वर्षनिहाय 90/- + 50 +35/- रुपये अशा प्रकारे 175/- याप्रमाणे प्रथम / द्वितीय / तृतीय याप्रमाणे करण्यात येत आहे .सदरच्या योजना अंतर्गत एका शेतकऱ्यास 02 हेक्टर क्षेत्राकरीता 600 रोपे प्रति हेक्टर या प्रमाणे एकुण 1200 बांबू रोपे लागवड व देखभाल करीता अनुदान देण्यात येईल .
या संदर्भात महसूल व वन विभागांकडून दिनांक 28.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..