live Marathipepar , बालाजी पवार प्रतिनिधी [ State Employee DA INCREASE GR ] : असूधारित वेतन संरचनेत सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्याच्या दरात दिनांक 01 जुलै 2023 पासून सुधारणा करणे संदर्भात वित्त विभागाकडून दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
असूधारित वेतन संरचनेत सहाव्या वेतन आयोगानुसार, वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्ण कालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या (DA) दरात सुधारणा करण्याचा प्रश्न राज्य शासनाच्या विचाराधीन होता , यानुसार आता राज्य शासन असे आदेश देत आहे , की दिनांक 01 जुलै 2023 पासून सहाव्या वेतन आयोगानुसार असूधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 221% वरून 230% करण्यात आला आहे .
सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 01 जुलै 2023 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीतील थकबाकीसह माहे नोव्हेंबर 2023 च्या वेतनासोबत रोखीने देण्याचे निर्देश सदर शासन निर्णयानुसार देण्यात आले आहेत .
त्याचबरोबर महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे , त्याचप्रमाणे यापुढे लागू असणार आहेत, असे सूचित करण्यात आले आहेत .
या संदर्भातील वित्त विभागाकडून दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहू शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.