Live marathiepapar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Asadharan Raja Niyam ] : राज्य कर्मचाऱ्यांना रजा नियमावलीनुसार , असाधारण रजा कधी व किती दिवसांची घेता येते , या संदर्भातील रजा नियमावली तसेच किती दिवसांची व कोणत्या प्रमाणात घेता येते या संदर्भातील सविस्तर रजा नियम पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
कर्मचाऱ्यांस कोणत्याही प्रकारची रजा अनुज्ञेय नसल्यास अथवा कर्मचाऱ्यांना इतर प्रकारची रजा अनुज्ञेय असताना देखिल असाधारण रजेची मागणी केली असता , सदरची रजा मंजूर करण्यात येते . राज्य शासनांच्या कायम सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीकरीता कोणत्याही प्रकारची रजा मंजूर होत नाही . तर अस्थायी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात काही मर्यादेपर्यंत ही रजा मंजूर करता येत असते .
राज्य शासनांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय 3 महिन्यांपर्यंत सदरची रजा मंजूर करता येते . तर 01 वर्षाच्या सेवेनंतर वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे 06 महिन्यांपर्यंत सदरची रजा मंजूर करण्यात येते . तर 05 वर्षांच्या सेवा नंतर वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे 12 महिन्यापर्यंत रजा मंजूर करण्यात येते .01 वर्षांच्या मानसिक रोग , कर्करोग याकरीता 12 महिन्यापर्यंत ही रजा मंजुर करण्यात येते .
तर 01 वर्षांच्या सेवेनंतर क्षयरोग , कुष्ठरोग याकरीता 18 महिन्यांची रजा मंजूर करण्यात येते . तर 03 वर्षांच्या सेवा नंतर – उच्च अभ्यासक्रमासाठी 24 महिन्यापर्यंत रजा मंजूर करण्यात येते . सेवेच्या कालावधीनुसार असाधारण रजा किती दिवसांची मंजूर करण्यात येते , हे पुढील चार्टप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | सेवा कालावधी | मंजुर रजा कालावधी |
01. | कोणताही कर्मचारी | 03 महिन्यापर्यंत |
02. | 01 वर्षानंतर | 06 महिन्यापर्यंत |
03. | 01 वर्षे सेवेनंतर ( कर्करोग , मानसिक रोग ) | 12 महिन्यापर्यंत |
04. | 01 वर्षे सेवेनंतर ( क्षयरोग , कुष्ठरोग ) | 12 महिन्यापर्यंत |
05. | 03 वर्षे सेवेनंतर ( उच्च अभ्यासक्रमासाठी ) | 18 महिन्यापर्यंत |
06. | 05 वर्षे सेवेनंतर ( वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे ) | 12 महिन्यापर्यंत |
यांमध्ये खाजगी कारणास्तव घेण्यात आलेल्या असाधरण रजेचे दिवस हे वेतन वाढीकरीता ग्राह्य धरण्यात येत नाहीत . तसेच दिनांक 01.02.2001 पासून खाजगी कारणास्तव घेण्यात आलेल्या असाधारण रजा सेवा निवृत्ती वेतनाकरीता देखिल ग्राह्य धरण्यात येत नाहीत . असाधारण रजा कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांस कोणतेही वेतन मिळत नाहीत , परंतु त्यास स्थानिक पुरक / प्रोत्साहन भत्ता तसेच घरभाडे भत्ता ( HRA ) मिळू शकतो .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.