दुसऱ्‍या टप्यांमध्ये तब्बल 15 हजार शिक्षकांची पदभरती ; शिक्षण विभागाकडून परवानगी !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ As many as 15 thousand teachers will be recruited in the second phase. ] : राज्य शासनांच्या शालेय शिक्षण विभागांमध्ये दुसऱ्या टप्यात तब्बल 15 हजार शिक्षकांची पदभरती करण्यात येणार आहे , याकरीता शालेय शिक्षण विभागांकडून परवानगी मागण्यात आली आहे .

शालेय शिक्षण विभाग मार्फत खासगी अनुदानित व जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांपैकी 80 टक्के शिक्षकांची पदभरती ही पुढील 30 जुनपर्यंत करण्यात येणार आहे . याकरीता 15 हजार शिक्षकांच्या पदभरतीकरीता परवानगी संदर्भातील प्रस्ताव राज्य शासनांकडू सादर करण्यात आला आहे .

तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात तब्बल 30 हजार शिक्षकांची पदभरती करण्याची घोषणा करण्यात आली होती , परंतु 23 हजार शिक्षकांचीच पदभरती करण्यात आली . जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तावाढीकरीता शिक्षकांची संख्या असून , आगामी काळांमध्ये इंग्रजी माध्यमातील सेमी इंग्रजीचे वर्ग सदर जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरु करण्याचे नियोजन असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .

जिल्हा परिषद शाळांमध्ये 10 टक्के पदे रिक्त आहेत , सदर पदांवर पदभरती करण्यात येणार आहेत . याशिवाय खासगी पदभरतीवेळी एका पदाकरीता 10 उमेदवार दिले जाणार आहेत , त्यातुन मुलाखतीच्या माध्यमातुन निवड करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला देण्यात आला आहे .

यामुळे राज्यतील डी.एड , बीएड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे . तर कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मंचाऱ्यांना देखिल या पदभरती मध्ये विशेष सवलत दिली जाणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .

Leave a Comment